CRIME : प्रेयसीचे महागडे शौक पूर्ण करण्यासाठी हे टीनेजर्स करत होते चोऱ्यामाऱ्या; पोलिसांनी टोळी ताब्यात घेऊन घेतला अनोखा निर्णय; वाचून पोलिसांचे कौतुक कराल

910 0

कानपूर : आतापर्यंत आपण नवयुवकांचा प्रेम आणि त्यांनी प्रेमात केलेल्या चित्रविचित्र गोष्टी ऐकल्या असतील. पण या चार-पाच नवयुवकांच्या टोळक्याने अजबच गोष्ट केली आहे. स्वतःचे आणि प्रेयसीचे महागडे शौक पूर्ण करण्यासाठी या 18 ते 20 वर्षाच्या नवयुवकांनी थेट चोरीमारी करायला सुरुवात केली.

या गोष्टीची या मुलांच्या घरच्यांना कानोकान खबर नव्हती. काहींचे वडील हे रिक्षा चालक आहेत, तर काहींचे वडील हे एखाद्या फॅक्टरीमध्ये कामगार म्हणून काम करतात. त्यांच्या घरच्यांना ही गोष्ट तेव्हा समजली जेव्हा पोलिसांनी या सर्वांना फोन करून बोलावून घेतलं.

तर झालं असं की, या तरुणांनी आपल्या मैत्रिणींची इच्छा पूर्ण करण्यासाठी चोरी करायला सुरुवात केली. यावेळी त्यांनी मोबाईल ,दुचाकी आणि अगदी पिस्तूल देखील त्यांच्याकडे आढळून आले आहेत. पोलिसांनी या मुलांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडून नऊ मोबाईल, दोन दुचाकी, पिस्तूल आणि दोन काडतुसे देखील जप्त केले आहेत. या मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण पोलिसांनी एक कौतुकास्पद निर्णय घेतला.

प्रत्येक व्यक्तीला सुधारण्याची एक संधी मिळायलाच हवी त्यामुळे या पोलिसांनी या मुलांच्या पालकांना बोलून त्यांचे समुपदेशन करण्याचा निर्णय घेतला.कदाचित आता मुलांवर कसे लक्ष ठेवावे, त्याना कसे अपप्रवृत्तींपासून लांब ठेवावे हे पालक शिकतील आणि मुले वाईट मार्गी जाणार नाहीत.

Share This News

Related Post

Suicide News

Suicide News : धाराशिव हादरलं! FB Live करून तरुणाने आपले आयुष्य संपवले; नेमके काय घडले?

Posted by - June 21, 2023 0
धाराशिव : धाराशिवमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका तरुणाने फेसबुक लाईव्ह करुन आपल्या आयुष्याचा शेवट (Suicide News) केला…

CM EKNATH SHINDE : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी केंद्र शासनाच्या धर्तीवर महागाई भत्त्यात 3 टक्क्यांनी वाढ

Posted by - August 16, 2022 0
राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी केंद्र शासनाच्या धर्तीवर महागाई भत्त्यात 3 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या…

विद्यार्थी हितासाठी सीईटी कक्षाने कालबद्ध पद्धतीने वेळापत्रकाचे नियोजन करावे – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

Posted by - September 28, 2022 0
मुंबई : विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन महाविद्यालयामध्ये प्रवेशाच्या वेळी विद्यार्थ्यांना अडचणी येऊ नयेत, यासाठी सीईटीकक्षाने कालबद्ध पद्धतीने वेळापत्रकाचे नियोजन करावे,…

उध्दव ठाकरेंची तोफ आज बुलढाण्यात धडाडणार; शेतकरी मेळाव्याला करणार संबोधित

Posted by - November 26, 2022 0
बुलढाणा: शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ आज शनिवारी (ता.26 नोव्हेंबर) बुलढाण्यात धडाडणार आहे बुलढाण्यातील चिखली…

मनसे नेते संदीप देशपांडे हल्ला प्रकरणी ताब्यात घेतलेल्या चौघांना अटक

Posted by - April 5, 2023 0
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणी महत्वाची अपडेट आली असून या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *