द्राक्ष व्यापाऱ्याकडील १ कोटींची रक्कम लुटणाऱ्या टोळीला फिल्मी स्टाइलने ८ तासात पोलिसांनी केले गजाआड

584 0

सांगलीच्या तासगावमध्ये द्राक्ष व्यापाऱ्याला मारहाण करत एक कोटी दहा लाखांचा रोकड लुटल्याचा प्रकार मंगळवारी घडला होता. सांगली पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत आरोपींच्या अवघ्या आठ तासात मुसक्या आवळल्या. या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे.

नितीन यलमार (वय 22),विकास पाटील (वय 32) आणि अजित पाटील (वय 22) असे तिघा आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी महेश केवलानी यांनी फिर्याद दिली आहे.

महेश केवलानी द्राक्ष व्यापारी आहेत. द्राक्ष खरेदी केल्यानंतर तासगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना पैसे देण्यासाठी 1 कोटी 10 लाखांचा रक्कम घेऊन केवलानी आपल्या स्कॉर्पिओ गाडीतून आले होते. तासगावच्या दत्तमाळ येथील वसंतदादा महाविद्यालयात शेजारी असणाऱ्या गणेश कॉलनी येथे केवलानी यांच्या गाडीचा पाठलाग केला. केवलानी आणि त्यांच्या चालकाला मारहाण करून आरोपींनी त्यांच्याकडील 1 कोटी 10 लाखांची रक्कम लुबाडून पोबारा केला होता. मंगळवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.

पोलिसांनी सांगली जिल्ह्यामध्ये नाकाबंदी करून आरोपींच्या तपासासाठी सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तीन पथके नेमली होती. दरम्यान तासगाव तालुक्यातील मनेराजुरी येथील शिकोबा डोंगराच्या पायथ्याला काही संशयित व्यक्ती थांबल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने छापा मारून तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे काही शस्त्र आणि रोकडे आढळून आली. तिघांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी सदरची रक्कम ही तासगाव शहरातल्या द्राक्ष व्यापाऱ्यांकडून लुटल्याचा सांगितले. यावेळी त्यांच्याकडून एक कोटी नऊ लाख रुपये आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा मुद्देमाल हस्तगत केला आहे, अशी माहिती सांगलीचे पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांनी दिली.

Share This News

Related Post

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून दिल्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा

Posted by - April 2, 2022 0
मुंबई- राज्यभरात आज गुढीपाडवा उत्साहात साजरा केला जात आहे. आज एकमेकांना नववर्षाच्या शुभेच्छा देत अनेकजण हा सण साजरा करत आहेत.…

वाहतूक पोलीस बनला देवदूत ! पुण्यात अपघातग्रस्त चिमुरडीला खांद्यावर उचलून नेत हॉस्पिटलमध्ये केलं दाखल..

Posted by - April 28, 2022 0
पुण्यातील वारजे पुलावर घडलेल्या विचित्र अपघाताची सीसीटीव्ही फुटेज समोर आली देवदूत बनून आलेल्या वाहतूक पोलिसानं कारमध्ये अडकून पडलेल्या चिमुरडीला स्वतःच्या…

वनवे,रॉंग टर्न…! बिनधास्त तोडा वाहतुकीचे नियम; दिवाळीमध्ये वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पालकमंत्र्यांचा अजब निर्णय

Posted by - October 19, 2022 0
पुणे : सध्या दिवाळीच्या खरेदीसाठी पुणेकर मोठ्या प्रमाणावर बाहेर पडत आहेत. त्यामुळे बाजारपेठेकडे जाणारे रस्ते प्रचंड जाम होत आहेत. पुण्यामध्ये…

कल्याण तालुक्यातील ग्रामपंचायतमध्ये भाजप-शिंदे गटाने उधळला गुलाल; राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे खाते देखील उघडले नाही

Posted by - December 20, 2022 0
कल्याण : कल्याण तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतच्या निवडणुकांचा आज निकाल जाहीर झाला आहे. या निकालाकडे सर्वांचे होतं कारण, आतापर्यंत या दोन्ही…

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे विविध पुरस्कार जाहीर; युवा पुरस्कार प्राजक्ता माळी, प्रियेशा देशमुख, रणजित काशिद, अमोल वाघमारे यांना जाहीर

Posted by - January 27, 2023 0
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून दरवर्षी देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे यांनी प्रजासत्ताक दिनाला…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *