सह्याद्रीच्या जंगलात तरुणाचा घोरपडीवर अनैसर्गिक अत्याचार, विकृतीचा कळस!

434 0

कोल्हापूर – लैंगिक अत्याचाराच्या घटना आपल्या वाचनात येणे ही नित्याची बाब झाली आहे. पण एका विकृत तरुणाने चक्क घोरपडी सोबत अनैसर्गिकपणे अत्याचार केल्याच्या घटनेने संतापाची लाट उसळली आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील कोल्हापूर जिल्ह्यात गोठणे बीटा भागात ही घटना घडली असून वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कोकणातून तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. आरोपींनी मोबाइलमधून केलेल्या व्हिडिओ शुटिंगमुळे ही बाब उघड झाली.

कोल्हापूर जिल्ह्यात गोठणे बीटा भागात तीन तरुण शिकारीसाठी हत्यारे घेऊन फिरत होते. त्यावेळी या तिघा तरुणांच्या हाती एक घोरपड लागली होती. या तीन तरुणांपैकी एकाने हे घृणास्पद कृत्य केले. व्याघ्र गणनेसाठी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात लावलेल्या ट्रेप कॅमेऱ्यात 31 मार्च रोजी शस्त्रांस्त्रासह तीन आरोपी दिसून आले. त्यानंतर गुप्त माहितीच्या आधारे एका आरोपीला हातिव गावातून तर दोन आरोपींना संगमेश्वर तालुका येथून ताब्यात घेण्यात आले.

आरोपींचे मोबाइल तपासल्यानंतर एका आरोपीने चक्क घोरपडीसोबतच संभोग केल्याचा रेकॉर्डेड व्हिडीओ वनाधिकाऱ्यांच्या हाती लागला. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. आरोपींवर कोणत्या कलमाखाली कारवाई करायची, यावर वन अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरु आहे. घोरपडी सोबत घृणास्पद कृत्य करणाऱ्याला आता वनविभाग मानसोपचार तज्ज्ञांच्या हवाली करण्याचा विचार करत आहे.

 

Share This News

Related Post

पुणेकर घेणार मेट्रो प्रवासाचा आनंद ! दिवसाला किती मेट्रो धावणार ? जाणून घ्या वेळापत्रक

Posted by - March 2, 2022 0
पुणे- महामेट्रोचे पुण्यात पहिल्या टप्यातील मार्गाचे काम पूर्ण झाले असून, त्याच्या उदघाटनाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. अवघ्या सहा दिवसांत…
Pune Accident

Pune Accident : कात्रज-कोंढवा रस्त्यावर पुन्हा अपघात; वृद्ध व्यक्तीचा जागीच मृत्यू

Posted by - August 14, 2023 0
पुणे : कात्रज – कोंढवा रोड गेल्या काही दिवसांपासून मृत्यूचा (Pune Accident) सापळा बनला आहे. या ठिकाणी अपघाताचे (Pune Accident)…

NITIN GADAKARI : 15 वर्षे उलटून गेलेल्या नऊ लाख जुन्या गाड्या स्क्रॅपमध्ये जाणार ! एक एप्रिल पासून…

Posted by - January 30, 2023 0
महाराष्ट्र : केंद्र आणि राज्य सरकारच्या आखत्यारितील 15 वर्षापेक्षा जास्त जुन्या गाड्या रस्त्यावरून हद्दपार करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता.…

#PUNE : कसबा पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी स्वतः शरद पवार उतरणार मैदानात

Posted by - February 17, 2023 0
पुणे : कसबा पोटनिवडणुकेचा प्रचार सध्या जोरदार सुरु आहे. प्रमुख पक्षांसह सर्वच उमेदवार आणि समर्थक मैदानात उतरून प्रचाराचा धडाका लावता…

हळदीच्या कार्यक्रमात तलवार, जांबिया घेऊन बेधुंद नाचणाऱ्या नवरदेवाला ठोकल्या बेड्या (व्हिडिओ)

Posted by - February 3, 2022 0
औरंगाबाद- हळदीच्या कार्यक्रमात मित्राच्या आग्रहास्तव हातात तलवारी, जंबिया घेऊन नाचणे अतिउत्साही नवरदेवाला चांगलेच महागात पडले आहे. औरंगाबाद शहरात घडलेल्या या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *