सोनाराच्या घरातून 85 लाखांच्या दागिन्यांची चोरी, विश्रांतवाडी पोलिसांनी ठोकल्या चौघांना बेड्या (व्हिडिओ)

556 0

पुणे – सोनाराच्या घरातून 85 लाखांच्या दोन किलो सोन्याच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या कामगाराला त्याच्या तीन साथीदारांसह विश्रांतवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. आरोपींमध्ये एका अल्पवयीन मुलाचा देखील समावेश आहे. आरोपींकडून 56 लाख 27 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.

याप्रकरणी मुकेश गोमाराम चौधरी (वय 22), रमेश रामलाल चौधरी (वय 27), भगाराम गोमाराम चौधरी (वय 38), जेठाराम कृष्णाजी चौधरी (वय 38, सर्वजण रा. खुडाला, बाली राजस्थान) सर्वांना अटक करण्यात आली आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय चांदखेडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, धानोरी भैरवनगर येथील सोनाराच्या घरातून 10 जानेवारी रोजी सुमारे 85 लाख रुपये किमतीचे दोन किलो 81 ग्रॅम सोन्याचे दागिने चोरी झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांनुसार गुन्ह्याच्या तपासासाठी एक विशेष पथक नेमण्यात आले होते. तपास पथकातील पोलीस अमलदार दीपक चव्हाण, प्रफुल मोरे, संदीप देवकाते, शेखर खराडे यांनी केलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या तांत्रिक तपासानुसार काही संशयित इसम मागील काही दिवसांपासून सोनाराच्या घराच्या परिसरात रेकी करत असताना आढळून आले. संबंधित सोनाराच्या दुकानात काम करणारा मुकेश चौधरी हा सुट्टीसाठी त्याच्या मूळ गावी राजस्थान येथे गेलेला असल्याची माहिती मिळाली होती.

गुन्ह्याचा तपास करताना या चोरीमध्ये मुकेश चौधरी याचाच हात असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीना राजस्थान येथून ताब्यात घेऊन अटक केली.

सदरची कारवाई अप्पर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त रोहिदास पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त रमेश गलांडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय चांदखेडे, गुन्हे निरीक्षक विजयकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रमुख उपनिरीक्षक लहू सातपुते, पोलीस हवालदार विजय सावंत, दीपक चव्हाण, यशवंत किरवे, पोलीस अंमलदार संदीप देवकाते, प्रफुल मोरे, शेखर खराडे, योगेश चांगण, शिवाजी गोपनर, तांत्रिक विश्लेषण विभाग परिमंडळ चारचे पोलीस अंमलदार श्याम शिंदे, विशेष पोलीस अधिकारी राज राठोड यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

Share This News

Related Post

Crime News

Crime News : विकृतीचा कळस ! पुतणीने नको त्या अवस्थेमध्ये पाहिल्यावर काकीने दिली ‘ही’ शिक्षा

Posted by - August 27, 2023 0
अलिगढ : उत्तर प्रदेशमधील अलिगढ या ठिकाणी माणुसकीला काळिमा फासणारी घटना (Crime News) उघडकीस आली आहे. यामध्ये आपले अवैध प्रेमसंबंध…

मोदींच्या डिग्रीबाबत विचारताच अजितदादांचा प्रतिप्रश्न- ” आता डिग्रीचं काढून काय होणार?

Posted by - April 3, 2023 0
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मोदींची डिग्री मागितल्याचा कारणावरून गुजरात हायकोर्टाने त्यांना 25 हजारांचा दंड ठोठावला. त्यानंतर गेल्या अनेक महिन्यांपासून…

मुंबईत काँग्रेस-भाजपमध्ये संघर्ष, काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढेच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Posted by - February 14, 2022 0
मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील काँग्रेसमुळे कोरोना पसरल्याचं विधान संसदेत केलं होतं. या विधानाचा निषेध करण्यासाठी काँग्रेसने राज्यभरात भाजपच्या…
Debu Khan

Debu Khan : लेखक राजन खान यांचा मुलगा डेबू खान मृत्यू प्रकरणी 4 जणांवर गुन्हा दाखल

Posted by - October 19, 2023 0
पुणे : प्रसिद्ध लेखक राजन खान यांच्या मुलाच्या मृत्यूप्रकरणी (Debu Khan) एक मोठी अपडेट समोर आली आहे. आर्थिक व्यवहारातून प्रसिद्ध…

मंगळवार ३१ जानेवारी २०२३ रोजी मंत्रिमंडळ बैठकीतील संक्षिप्त निर्णय

Posted by - January 31, 2023 0
महाराष्ट्राला मिळाले राज्यगीत. ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ या गीताचा महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून स्वीकार. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *