कोरोनाची लस घेण्यासाठी कोणालाही सक्ती करता येणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

179 0

नवी दिल्ली- एखाद्या व्यक्तीला कोरोनाची लस घेण्यासाठी सक्ती केली जाऊ शकत नाही असा महत्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. लसीकरण सक्तीचे केले जावे या मागणी करता न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. तसेच सरकारला क्लिनिकल ट्रायल्सची आकडेवारी जाहीर करण्याचे निदेश देण्यात आले आहेत.

आपल्या निर्देशात न्यायालयाने असे म्हटले आहे की, कोरोना हा एक साथीचा गंभीर आजार आहे. कोरोना सारख्या गंभीर विषयात सरकार धोरण ठरू शकते. साथीच्या आजाराचा सार्वजनिक आरोग्याला असलेला धोका लक्षात घेऊन काही निर्बंध, अटी देखील घालू शकते. मात्र कोणालाही लस घेण्यासाठी सक्ती केली जावू शकत नसल्याचे कोर्टाने म्हटले आहे. एवढेच नव्हे तर लसीकरणाचे काही दुष्परीणाम झाले आहेत का? झाले असल्यास काय झाले याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश देखील न्यायालयाकडून केंद्राला देण्यात आले आहेत.

काही राज्यातील सरकारांनी करोना लस घेण्यासाठी सक्ती केली होती. सार्वजनिक ठिकाणी प्रवेश करण्यासाठी करोना लसीकरण बंधनकारक करता येणार नाही. ज्या राज्यांनी अशा प्रकारचे नियम केले असतील ते त्यांनी मागं घ्यावेत, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. करोना लसीचा मानवी आरोग्यावर झालेला चांगले परिणाम आणि विपरीत परिणाम याचा अभ्यास करण्यात यावा, असेही न्यायालयाने सुचवले आहे.

Share This News

Related Post

‘राज’ गर्जना होणार! मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेला अखेर परवानगी

Posted by - April 28, 2022 0
गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या राज ठाकरे यांच्या औरंगाबादमध्ये होणाऱ्या जाहीर सभेला परवानगी अखेर परवानगी मिळाली आहे. औरंगाबाद पोलिसांकडून ही…

जितेंद्र आव्हाड प्रकरण : शरद पवारांचा थेट मुख्यमंत्र्यांना फोन; “राजकीय हेतूने अशा कारवाया टाळाव्यात..! वाचा सविस्तर

Posted by - November 15, 2022 0
मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाराष्ट्राचं राजकारण प्रचंड ढवळून निघाल आहे. कोणत्या ना कोणत्या प्रकरणामुळे ते शांत होण्याचं नाव…

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत शरद पवार म्हणतात…

Posted by - May 10, 2022 0
ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे.काही पक्षांमध्ये कोर्टाच्या आदेशानंतर संभ्रमाचं वातावरण आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष…

कल्याण तालुक्यातील ग्रामपंचायतमध्ये भाजप-शिंदे गटाने उधळला गुलाल; राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे खाते देखील उघडले नाही

Posted by - December 20, 2022 0
कल्याण : कल्याण तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतच्या निवडणुकांचा आज निकाल जाहीर झाला आहे. या निकालाकडे सर्वांचे होतं कारण, आतापर्यंत या दोन्ही…

राज्य पात्रता परीक्षेचा (सेट) निकाल जाहीर, या संकेतस्थळावर पाहा निकाल

Posted by - January 29, 2022 0
पुणे- महाविद्यालयातील सहायक प्राध्यापक पदासाठी घेण्यात येणाऱ्या राज्य पात्रता परीक्षा (सेट) परीक्षेचा निकाल 28 जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *