कोरोना आटोक्यात येतोय ! देशात कोरोनाचे एक लाखांपेक्षा कमी रुग्ण, 895 जणांचा मृत्यू

112 0

नवी दिल्ली- सर्वसामान्य नागरिकांसाठी दिलासादायक बातमी म्हणजे देशात गेल्या काही महिन्यांपासून तीव्र असलेली कोरोनाची तिसरी लाट आता ओसरताना पाहायला मिळत आहे. जवळपास महिनाभरानंतर प्रथमच आज कोरोनाचे नवीन रुग्ण एक लाखांपेक्षा कमी आढळून आले आहेत.

गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 83 हजार 876 नवे रुग्ण आढळले असून 895 जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक लाख 99 हजार 54 लोक बरे झाले आहेत. यासह, कोरोनाचा सकारात्मकता दर आता 7.25 टक्क्यांवर आला आहे.

कोरोनाचे नवे रुग्ण आल्यानंतर आता देशातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 11 लाख 8 हजार 938 वर गेली आहे, तर आतापर्यंत एकूण 5 लाख 2 हजार 874 जणांना या साथीमुळे आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाच्या नवीन रुग्णांमध्ये घट होत असताना आतापर्यंत 169 कोटींचे लसीकरण करण्यात आले आहे.

महाराष्ट्रात कोरोनाचे 9 हजार 666 नवे रुग्ण

रविवारी महाराष्ट्रात आणखी 9 हजार 666 रुग्णांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळून आले असून, एकूण संसर्गाची संख्या 78 लाख 3 हजार 700 झाली आहे, तर 66 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 1 लाख 43 हजार 74 वर पोहोचली आहे. एका दिवसात एकूण 25 हजार 175 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून, या आजारातून बरे झालेल्यांची संख्या 75 लाख 38 हजार 611 झाली आहे. आता राज्यात 1 लाख 18 हजार 76 रुग्ण कोविड 19 वर उपचार घेत आहेत. रविवारी राज्यात ओमैयक्रॉन प्रकाराच्या संसर्गाचा एकही नवीन रुग्ण आढळलेला नाही. आतापर्यंत 3 हजार 334 रुग्णांना या ओमायक्रॉनची लागण झाल्याचे आढळून आले आहे. मुंबईत कोरोनाचे 536 नवीन रुग्ण आढळले असून तीन रुग्णांचा मृत्यू झाला. यासह, कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या 10 लाख 50 हजार 455 आणि मृतांची संख्या 16 हजार 661 वर पोहोचली आहे.

Share This News

Related Post

RBI

RBI : महाराष्ट्रातील ‘या’ बँकेवर आरबीआयची मोठी कारवाई; परवाना केला रद्द

Posted by - December 6, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इचलकरंजी येथील नागरी सहकारी बँकेवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBI कडून मोठी कारवाई करण्यात…

राजर्षी छत्रपती शाहू महाराज सर्वकालीन आदर्श राजे- उपमुख्यमंत्री अजित पवार

Posted by - June 26, 2022 0
मुंबई दि. 26 :- राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा रयतेच्या कल्याणाचा वसा व वारसा समर्थपणे पुढे नेला. उपेक्षित,…

#HEALTH WEALTH : ‘या’ चुकीच्या सवयींमुळे तुम्ही लहान वयातच दिसू लागता वृद्ध; तुम्हालाही आहेत का या सवयी ?

Posted by - March 2, 2023 0
#HEALTH WEALTH : आधुनिक काळात लोकांना धकाधकीचे जीवन जगण्याची सवय लागली आहे. याचा मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर वाईट परिणाम होतो.…

Breking News ! केतकी चितळे प्रकरणी केंद्रीय महिला आयोगाची पोलीस महासंचालकांना नोटीस

Posted by - June 16, 2022 0
मुंबई- महाराष्ट्रात गाजलेल्या केतकी चितळे प्रकरणाला नवी कलाटणी मिळाली आहे. केंद्रीय महिला आयोगाने याबाबत राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांना…
Prakash Ambedkar

Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांनी घातला टीपू सुलतानच्या फोटोला हार; Video व्हायरल

Posted by - November 30, 2023 0
सांगली : वंचित बहुजन आघाडीची सत्ता संपादन सभा बुधवारी सांगलीमध्ये पार पडली. या सभेमध्ये वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar)…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *