उपमुख्यमंत्र्यांसह आरोग्यमंत्र्यांनी घेतला कोरोना प्रतिबंधक लसीचा बुस्टर डोस

281 0

मुंबई- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज कोरोना प्रतिबंधक लसीचा बुस्टर डोस घेतला. राज्याला कोरोनामुक्त करण्यासाठी राज्यातील जनतेने कोरोना प्रतिबंधक लस घेण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी केले.

मुंबई येथील ग्रॅंट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर ज. जी. समुह रुग्णालयात उपमुख्यमंत्री अजित पवार व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा बुस्टर डोस घेतला.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, “ज्या नागरिकांचे कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस झाले आहेत, त्या बुस्टर डोससाठी पात्र नागरिकांनी बुस्टर डोस घ्यावा. ज्यांचा पहिला डोस झाला आहे, त्यांनी दुसरा डोस घ्यावा व ज्यांचा एकही डोस झाला नाही त्यांनी पहिला डोस तातडीने घ्यावा” तसेच कोरोना प्रतिबंधक लस घेण्याबरोबरच कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

Share This News

Related Post

इच्छुकांनो तयारीला लागा! महापालिकांसाठी 29 जुलैला आरक्षण सोडत

Posted by - July 23, 2022 0
ओबीसी आरक्षणाच्या पेचामुळं रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचा मार्ग आता मोकळा झालाय. यासाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाकडून जाहीर…

विकास पाठक उर्फ हिंदुस्तानी भाऊला मिळाला जामीन

Posted by - February 17, 2022 0
मुंबई- दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन परीक्षेवरून आंदोलनासाठी भडकवल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या हिंदुस्तानी भाऊ उर्फ विकास पाठकला जामीन मिळाला असून त्याची जेलमधून…

परळीत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात भव्य तिरंगा रॅली… पाहा VIDEO

Posted by - August 13, 2022 0
परळी : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त परळी शहरात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये…

#HEALTH WEALTH : मासिक पाळीदरम्यान महिलांनी करू नये या 5 चुका, वाढू शकतात अडचणी

Posted by - March 8, 2023 0
मासिक पाळीदरम्यान महिलांना पोटदुखी, पेटके, अंगदुखी, मूड स्विंग आणि अनेकवेळा थकव्याला सामोरे जावे लागते. मासिक पाळीच्या काळात दैनंदिन जीवनात अनेक…
Sangli Crime News

Sangli Crime News : तुझ्याच आठवणीत जगत राहीन, पण पुन्हा तुझ्या आयुष्यात येणार नाही; म्हणत तरुणाने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

Posted by - August 6, 2023 0
सांगली : सांगली (Sangli Crime News) जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे.यामध्ये सांगली जिल्ह्यातील (Sangli Crime News) शिराळा तालुक्यातील वारणा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *