बालासोर जिल्ह्यात कोरोमंडल आणि दुरांतो एक्स्प्रेसची समोरासमोर टक्कर

454 0

ओडिशातील बलसोरपासून सुमारे 40 किमी अंतरावर या ट्रेनची मालगाडीसोबत टक्कर झाल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातात ट्रेनचे काही डब्बे रुळावरुन घसरले आहेत. या घटनेत 900 प्रवासी जखमी झाले आहेत तर 200 हुन अधिक जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. भारतातील हा सर्वात भीषण रेल्वे अपघात असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यताही अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार कोरोमंडल एक्सप्रेस आणि मालगाडी एकाच मार्गावर आल्याने हा अपघात झाला. रेल्वे ट्रॅकवर सिग्नल खराब झाल्याने दोन्ही गाड्या एकाच रुळावर आदळल्याची प्राथमिक माहिती आहे. ही ट्रेन दुपारी 3.15 वाजता शालीमार स्टेशनवरून निघाली. बालासोर, ओडिशापासून 40 किलोमीटर दूर, बहनगा स्टेशनजवळ मालगाडीला धडकली आणि रुळावरून घसरली.आतापर्यंत 50 हून अधिक प्रवाशांना बहनगा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे रुळावरून घसरल्याच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.

 

Share This News

Related Post

लोकपाल विधेयक संयुक्त चिकित्सा समितीच्या माध्यमातून तपासावे, त्यासाठी कालमर्यादा निश्चित व्हावी : ना. डॉ. नीलम गोऱ्हे

Posted by - March 25, 2023 0
मुंबई : विधान मंडळाच्या सभागृहात आलेले लोकपाल विधेयक संयुक्त चिकित्सा समितीच्या माध्यमातून तपासावे. त्यासाठी कालमर्यादा निश्चित करण्यात यावी, अशी सूचना…

CM EKNATH SHINDE : राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा; प्रति क्विंटल 300 रुपये सानुग्रह अनुदान

Posted by - March 13, 2023 0
मुंबई : राज्यात अडचणीत सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रति क्विंटल ३०० रुपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ…

पंकजा मुंढे आणी धनंजय मुंढे यांचा फोटो एकाच बॅनरवर? परळीतील या निवडणुकीसाठी … !

Posted by - December 9, 2022 0
भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांचा फोटो एकाच बॅनरवर आल्यामुळे नवीन चर्चेला विषय मिळाला आहे.…

यंदा पावसाचे आगमन दहा दिवस आधीच, कधी येणार मान्सून ? जाणून घ्या

Posted by - May 6, 2022 0
नवी दिल्ली- समस्त देशवासियांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. यंदा देशात 10 दिवस आधीच मान्सून दाखल होणार आहे. मान्सून 20 किंवा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *