रुग्ण हक्क परिषदेच्या वतीने संविधान दिन साजरा! संविधानाच्या 1000 प्रतींचे वाटप

167 0

पुणे : 26 नोव्हेंबर हा भारतीय स्वातंत्र्य दिन, देशात मोठ्या आनंदात उत्साहात साजरा होत असताना रुग्ण हक्क परिषद पुणे शहर कमिटीच्या वतीने संविधान जागृती अभियानाचे आयोजन करून भारतीय संविधान ग्रंथाच्या 1000 प्रतींचे वाटप रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.आज रुग्ण हक्क परिषदेच्या वतीने संविधान दिनी प्रसिद्ध गायक विशाल चव्हाण यांना भारतीय संविधान ग्रंथ भेट दिला. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. उमेश चव्हाण, लोक जनशक्ती पार्टीचे शहराध्यक्ष संजय भाऊ आल्हाट, वंचित नेते नागेश भोसले, परिषदेचे अजय भालशंकर, शहराध्यक्ष अपर्णाताई साठे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना उमेश चव्हाण म्हणाले कि, कामगारांची पिळवणूक, स्त्रियांचे शोषण विरोध शेतकऱ्याचे हाल, अस्पृश्यता निवारण, ओबीसी आदिवासींचे हक्क अधिकार, सर्वांना संधीची व दर्जाची समानता, स्वतःचा विकास साधण्याची संधी या सर्व गोष्टींची उत्तरे केवळ भारतीय संविधानाने लोकांना दिली. भारताचे संविधान हे कोणत्याही धर्मग्रंथांपेक्षा पवित्र आहे.
यावेळी रुग्ण हक्क परिषदेचे कविता डाडर, चित्रा साळवे, प्रभा अवलेलू, सतिका गायकवाड, विकास साठे, विशाल मारणे, विकास साठे, नितीन चाफळकर, श्रीनिवास कुलकर्णी, यशवंत भोसले उपस्थित होते.

भारतीय संविधानाचा विजय असो! भारतीय संविधान चिरायू होवो!! अशा घोषणा देत रुग्ण हक्क परिषदेच्या वतीने संविधान दिनी 1000 संविधान ग्रंथाच्या प्रतींचे वाटप करण्यात आले.

Share This News

Related Post

Raj Thackery

‘हिंदू धर्म इतका कमकुवत आहे का?’ राज ठाकरेंनी त्र्यंबकेश्वर वादावरुन फटकारलं

Posted by - May 20, 2023 0
नाशिक : काही दिवसांपूर्वी नाशिक (Nashik) मधील त्र्यंबकेश्वर मंदिरात (Trimbakeshwar Temple) घडलेल्या प्रकाराबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS President Raj…

माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या खांद्याला दुखापत; नागपूरमध्ये प्राथमिक उपचार, स्वतः माहिती देताना म्हणाले कि, …

Posted by - December 26, 2022 0
नागपूर : माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना आज मॉर्निंग वॉकला गेले असताना दुखापत झाली आहे. थोरात यांच्या खांद्याला दुखापत…
election-voting

ईव्हीएममध्ये कॅमेरा?… बोटाला शाईही नाही?… कधीपासून होणार बदल…

Posted by - May 22, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बोगस मतदान (Bogus voting) रोखण्यासाठी निवडणूक आयोगाकडून (Election Commission) एक नवीन शक्कल लढवण्यात येणार आहे.…

औरंगाबादमध्ये 9 मेपर्यंत जमावबंदी ! राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी मिळणार का ?

Posted by - April 26, 2022 0
औरंगाबाद- औरंगाबादमध्ये आजपासून 9 मे पर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची १ मे रोजी…
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर नाव वापरणार नाही’;राज्य सरकारने मुंबई हायकोर्टाला दिली हमी

Posted by - June 29, 2023 0
मुंबई : उस्मानाबाद आणि औरंगाबाद या दोन जिल्हांच्या नामांतराचा (Chhatrapati Sambhajinagar) वाद मुंबई उच्च न्यायालयात आहे. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाने…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *