पुण्यात भाजप कार्यालयासमोर काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने (व्हिडिओ)

220 0

पुणे- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा आणि राज्यसभेत केलेल्या वक्तव्यावरून देशभरात राजकारण पेटले आहे. महाराष्ट्र काँग्रेसने कोरोना पसरविला असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता. पंतप्रधानांच्या या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी कॉंग्रेसने पुण्याच्या भाजप कार्यालयासमोर जोरदार आंदोलन सुरु केले. त्याचवेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरु केल्यामुळे भाजपा कार्यालय समोर काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झाले होते.

एकीकडे काँग्रेसचे नेते कोरोना आम्ही नाही तर मोदी सरकारने पसरवला असा आरोप करत होते. तर दुसरीकडे भाजपचे कार्यकर्ते याला विरोध करत होते. त्यामुळे या ठिकाणी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे म्हणाले, ” केंद्र सरकारने गेल्या दोन-तीन वर्षात पेट्रोल डिझेलचे दर वाढवले त्याचा फटका सामान्य जनतेला बसत आहे. कोरोना काँग्रेसने पसरवला असा खोटा आरोप केला आहे. मोदी सरकार कोरोना हाताळण्यात अपयशी ठरले आहे याचा त्यांना फटका महानगरपालिका निवडणुकीत नक्कीच बसेल”

भाजपचे कार्यकर्ते प्रतीक देसरडा म्हणले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणतेही चुकीचे वक्तव्य केले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना काळात किती चांगले काम केले हे सामान्य जनतेला चांगलेच माहीत आहे”

Share This News

Related Post

पुणे : आमदार जयकुमार गोरे यांची मंत्री शंभूराज देसाई यांनी घेतली भेटली; तब्येतीची केली विचारपूस VIDEO

Posted by - December 24, 2022 0
पुणे : आमदार जयकुमार गोरे यांची राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी सायंकाळी रुबी हॉल क्लिनिक मध्ये जाऊन भेट…
Debit Card

Debit Card : 31 ऑक्टोबरनंतर ‘या’ सरकारी बँकेचे Debit Card होणार बंद; ग्राहकांना काढता येणार नाहीत पैसे

Posted by - October 17, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्याच्या काळात डेबिट कार्डचा (Debit Card) वापर जवळपास प्रत्येकजण करत असतो. आता 31 ऑक्टोबरला एका…

पिंपरीत दहशत ‘त्या’ हल्लेखोरांची; किरकोळ कारणावरून बाप-लेकीवर सिमेंट ब्लॉकने हल्ला, दैव बलवत्तर म्हणून…वाचा सविस्तर प्रकरण

Posted by - November 22, 2022 0
पिंपरी : पिंपरी शहरात दिवसेंदिवस स्ट्रीट क्राइमच्या घटना वाढत चालल्या आहेत. पिंपरी येथील जयहिंद कॉलेजच्या कार्नरला दुचाकी घासल्याच्या किरकोळ कारणावरुन आपल्या…
Atul Kulkarni

Sambhaji Bhide : ‘मारलं की मरायचं असतं’; रील शेअर करत अतुल कुलकर्णीचे भिडेंना प्रत्युत्तर

Posted by - July 31, 2023 0
मुंबई : संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबाबत एक आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. त्यामुळे राजकीय वातावरण मोठ्या…

महत्वाची बातमी ! ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास सुप्रीम कोर्टाची परवानगी

Posted by - May 18, 2022 0
नवी दिल्ली- ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास सुप्रीम कोर्टाने मध्य प्रदेश सरकारला परवानगी दिली आहे. ओबीसी आरक्षणासाठी मुख्यमंत्री…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *