गरवारे महाविद्यालय ते न्यायालय मेट्रो मार्गाचे काम 26 जानेवारीपर्यंत पूर्ण करा – पालकमंत्री

227 0

पुणे : शहरातील मेट्रोच्या कामाला गती देऊन गरवारे महाविद्यालय ते न्यायालय आणि फुगेवाडी ते न्यायालय या मेट्रोमार्गाचे काम २६ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्यात यावे, अशा सूचना राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.ब्रिजेश दिक्षीत, संचालक अतुल गाडगीळ, कार्यकारी संचालक हेमंत सोनवणे उपस्थित होते.

श्री.पाटील म्हणाले, मार्च अखेरपर्यंत शहरात सुरू असलेल्या ३३ किलोमीटरच्या मेट्रो लाईनचे काम पूर्ण होईल असे नियोजन करण्यात यावे. महामेट्रोला कामाची गती वाढविण्यासाठी शासनातर्फे आवश्यक सहकार्य करण्यात येईल. दुसऱ्या टप्प्यातील प्रकल्प अहवालाला शासनाची मंजूरी मिळावी यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचा आढावा
पालकमंत्री श्री.पाटील यांनी पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचा आढावा घेतला. यावेळी एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे, अपर जिल्हाधिकारी वैशाली इंदानी उपस्थित होते. अपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. श्री.गटणे यांनी शहरातील प्रकल्पांच्या सद्यस्थितीविषयी यावेळी माहिती दिली.

स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांचाही आढावा
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुणे स्मार्ट सिटी डेव्हलमेंट कार्पोरेशनच्या प्रकल्पांचाही आढावा घेतला. यावेळी कार्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोलते, मुख्य लेखा व वित्त अधिकारी उल्का कळसकर, मुख्य ज्ञान अधिकारी दिनेश वीरकर, मुख्य अभियंता अरुण गोडबोले, कंपनी सचिव स्वानंद शेडे उपस्थित होते.

स्मार्ट सिटीचे प्रकल्प नागरिकांच्या जीवनशैलीत अधिक चांगले बदल होण्याच्यादृष्टीने उपयुक्त असून या थीमबेस्ड प्रकल्पांना अधिक गती द्यावी, असे निर्देश यावेळी पालकमंत्र्यांनी दिले.

यावेळी श्री. कोलते यांनी स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या प्रकल्पांची माहिती दिली. कॉर्पोरेशनच्या प्रकल्पांची सद्यस्थिती, निधीची आवश्यकता आदींविषयी यावेळी चर्चा करण्यात आली.

Share This News

Related Post

12 खासदारांसह अनेक उद्योगपती आज बारामतीत ; राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची घेणार भेट

Posted by - March 27, 2022 0
राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे प्रमुख आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या भेटीला विविध पक्षांचे १२ खासदार शनिवारी बारामतीमध्ये दाखल झालेले आहे.…
Pune News

Pune News : हृदयद्रावक ! रक्षाबंधनादिवशी अपघात; बहिणीचा मृत्यू तर भाऊ जखमी

Posted by - August 31, 2023 0
पुणे : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील (Pune News) बोरीभडक फाट्यावर चारचाकीने बहीण-भावाच्या दुचाकीला धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. या भीषण…

शिंदे गटाची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर; एकनाथ शिंदे यांचे मुख्य नेतेपदी निवड तर दीपक केसरकर मुख्य प्रवक्ते

Posted by - July 18, 2022 0
मुंबई: शिवसेनेच्या 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याची सुनावणी सुप्रीम कोर्टात होणार असून या सुनावणीआधी शिंदे घटना मोठी खेळी खेळली असून…
Kolhapur

नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी पूजा करत असताना अचानक वडाच्या झाडाने घेतला पेट (Video)

Posted by - June 3, 2023 0
कोल्हापूर : आज महाराष्ट्रभरात ठीकठिकाणी वटपौर्णिमेचा (Vatpurnima) सण साजरा केला जात आहे. या सणानिमित्त महिला वडाच्या झाडाची पूजा करून पतीच्या…
Accident News

Accident News : पुणे-सोलापूर महामार्गावर ट्रकचा भीषण अपघात; मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी

Posted by - July 18, 2023 0
पुणे : पुणे -सोलापूर महामार्गावर केमिकलने भरलेल्या टॅंकरचा भीषण अपघात (Accident News) झाला आहे. उरुळी कांचनमधील एलाईट चौकामध्ये हा भीषण…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *