मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याच्या कार्यपध्दतीसाठी नेमलेली समिती ११ ऑक्टोबरपासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर

1277 0
  1. मुंबई: मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपध्दती विहीत करण्यासाठी गठित केलेल्या समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) व समिती सदस्य हे ११ ऑक्टोबर ते २३ ऑक्टोबर २०२३ याकालावधीत छत्रपती संभाजीनगर विभागाचा जिल्हानिहाय दौरा करणार आहे. सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भात विभागीय आयुक्तांना पत्र पाठवून समितीच्या जिल्हानिहाय दौऱ्याचे वेळापत्रक कळविले आहे.

या दौऱ्या दरम्यान, समितीचे अध्यक्ष व सदस्य कामकाजाच्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर विभागातील (मराठवाडा) सर्व जिल्ह्यांमध्ये बैठक घेणार आहेत. जिल्ह्यातील नागरिकांनी त्यांच्याकडील उपलब्ध निजामकालीन पुरावे, वंशावळी, शैक्षणिक पुरावे, महसूली पुरावे, निजाम काळात झालेले करार, निजामकालीन संस्थानिकांनी दिलेल्या सनदी, राष्ट्रीय दस्तावेज इ. समितीस उपलब्ध करुन देण्यात यावीत, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

कसं असेल समितीच्या बैठकीचे वेळापत्रक 

समितीची पहिली बैठक छत्रपती संभाजीनगर येथे बुधवार दि. ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.०० वाजता विभागीय आयुक्त कार्यालय येथे होणार आहे. त्यानंतर जालना येथे जिल्हाधिकारी कार्यालयात दि. १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.०० वाजता बैठक घेण्यात येणार आहे. दि. १६ ऑक्टोबरला परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी ११.०० वाजता समितीची बैठक होणार आहे. त्यानंतर हिंगोली येथे दि.१७ ऑक्टोबरला सकाळी ११.०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे, नांदेड येथे दि. १८ ऑक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी ११.०० वाजता ही बैठक होणार आहे. दि.२१ ऑक्टोबरला लातूर येथे जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी ११.०० वाजता, धाराशिव येथे दि.२२ ऑक्टोबरला सकाळी ११.०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे तर बीड येथे दि. २३ ऑक्टोबरला सकाळी ११.०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात समितीची बैठक होणार आहे.

Share This News

Related Post

मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांना जामीन; आठ वर्षांनंतर येणार तुरुंगा बाहेर

Posted by - August 20, 2023 0
बोगस लाभार्थीच्या नावे कर्ज काढून अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाची फसवणूक केल्याप्रकरणी माजी आमदार रमेश कदम जामीन मंजूर झाला…

पुणे जिल्ह्यातील प्रलंबित रस्त्यांची कामे त्वरेने करावीत; सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे निर्देश

Posted by - March 21, 2023 0
मुंबई : पुणे जिल्ह्यातील हायब्रीड अॅन्युईटी कार्यक्रमांतर्गत पीएन-२४ आणि पीएन-२५ या रस्त्यांच्या प्रकल्पाची कामे सुरू आहेत. मात्र ही कामे ठेकेदार…

उधारीचा वायदा करणारा आणि जबाबदारी टाळणारा राज्याचा अर्थसंकल्प ; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांची प्रतिक्रिया

Posted by - March 11, 2022 0
राज्याच्या अर्थमंत्र्यांनी  मांडलेला अर्थसंकल्प हा उधारीचा वायदा करणारा आणि महत्त्वाच्या विषयांत जबाबदारी टाळून दिशाभूल करणारा आहे, अशी टीका भारतीय जनता…

‘हर हर महादेव’ चित्रपटाला विरोध का होतोय ? काय आहे प्रकरण ? जाणून घ्या VIDEO

Posted by - November 8, 2022 0
‘हर हर महादेव’ या ऐतिहासिक चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील अनेक प्रसंगांवर आक्षेप घेण्यात आलाय. चित्रपटातील अनेक प्रसंग आतापर्यंत सांगितल्या…

पुण्यातील जम्बो कोविड सेंटर घोटाळा प्रकरणी एकाला अटक

Posted by - May 1, 2023 0
पुणे: सुजित पाटकर यांचा लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसचे भागीदार राजू नंदकुमार साळुंखे यांना पुण्यातील जम्बो कोविड सेन्टर च्या गैरव्यवहार प्रकरणी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *