AGNNIVEER : पोलीस , अग्निवीर भरतीसाठी आलेल्या तरूणांना जिल्हा प्रशासनाकडून सोयी-सुविधा देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

266 0

मुंबई : पोलीस, अग्निवीर भरतीसाठी येणाऱ्या तरूणांची राहण्याची, नाश्त्याची सोय जिल्हा प्रशासनामार्फत करावी व त्याठिकाणी आवश्यक आरोग्य सुविधा पुरविण्यात याव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. यासंदर्भात आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले होते.

देशसेवा करण्याच्या दृष्टीने पोलीस व अग्निवीर या सेवेत भरतीसाठी युवा वर्ग उत्साहाने सहभागी होतात. त्यातील अनेक तरूण सर्वसामान्य गरीब कुटुंबातील असतात. लांब अंतरावरून भरतीसाठी हे तरूण येतात. त्यांची त्याठिकाणी गैरसोय होऊ नये याकरिता ज्या जिल्ह्यांमध्ये अशी भरती चाचणी होईल तेथील जिल्हा प्रशासनामार्फत जिल्हा परिषद किंवा महापालिका शाळांमध्ये या तरुणांची राहण्याची सोय करतानाच नाश्ता, आरोग्य सुविधा देण्यात याव्यात, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

अग्निवीर भरतीसाठी चाचणीदरम्यान, धावणाऱ्या 21 वर्षीय तरूणाचा मृत्यू झाल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर भरतीसाठी येणाऱ्या तरूणांना शासनाकडून सुविधा मिळण्याबाबतची मागणी पत्राद्वारे करण्यात आली होती. त्याची तातडीने दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी तरूणांची गैरसोय होणार नाही यासाठी जिल्हा प्रशासनाने दक्षता घ्यावी, अशा सूचना मुख्यमंत्र्यानी दिल्या.

Share This News

Related Post

नारायण राणेंना हायकोर्टाचा दिलासा, बंगल्यावर तुर्तास कारवाई न करण्याचे आदेश

Posted by - March 22, 2022 0
मुंबई- मुंबई हायकोर्टाने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना दिलासा दिला आहे. मुंबई महापालिकेने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना बंगल्याबाबत नोटीस…

गुन्हेगारांची आता खैर नाही ! फौजदारी प्रक्रिया विधेयक लोकसभेत मंजूर, जाणून घ्या त्याची संपूर्ण माहिती

Posted by - April 5, 2022 0
नवी दिल्ली- लोकसभेने क्रिमिनल प्रोसिजर रिकग्निशन बिल 2022 मंजूर केले आहे. या विधेयकात गुन्हेगारांची ओळख आणि गुन्हेगारी प्रकरणांचा तपास आणि…

Deputy CM Devendra Fadnavis : “आता विस्तार झाला…सरकारही मजबूत …काहीही प्रश्न उपस्थितीत झाला नाही !”

Posted by - August 9, 2022 0
पुणे : शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाले तरी मंत्रिमंडळ विस्तार होत नाही म्हणून काही लोक बोलत होते. विस्तार झाला तर…

पुणे महानगरपालिकेची आरक्षण सोडत जाहीर

Posted by - July 29, 2022 0
पुणे: ओबीसी राजकीय आरक्षण जाहीर झाल्यानंतर आज पुणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ची आरक्षण सोडत जाहीर झाली. अनुसूचित जातीसाठी (एससी) 22…
Narendra Dabholkar

डॉ. नरेंद्र दाभोलकर खून तपासाप्रकरणी सुप्रीम कोर्टाची सीबीआयला नोटीस

Posted by - May 19, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – डॉ नरेंद्र दाभोलकर (Dr. Narendra Dabholkar) यांच्या खूनाच्या प्रकरणातील तपास बंद करण्याच्या सीबीआयच्या (CBI) निर्णयाच्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *