CM EKNATH SHINDE : राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा; प्रति क्विंटल 300 रुपये सानुग्रह अनुदान

516 0

मुंबई : राज्यात अडचणीत सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रति क्विंटल ३०० रुपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली. या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

यासंदर्भात विधानसभेत निवेदन करताना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, खरीप हंगामातील लाल कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर आहे. देशातील इतर राज्यातील कांद्याचे उत्पादन वाढल्याने पुरवठ्याच्या प्रमाणात मागणी कमी आहे. त्यामुळे कांद्याच्या दरामध्ये घसरण झाली आहे. कांदा नाशवंत पीक असल्याने त्याला किमान आधारभूत किंमत लागू करता येत नाही. कांदा हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे नगदी पीक असून त्याला मिळणारा भाव कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील जिव्हाळ्याचा भाग आहे.

देशातील कांदा उत्पादन त्याची देशांतर्गत मागणी व देशातून होणारी निर्यात इत्यादी सर्व बाबींचा परिणाम बाजारपेठेतील कांद्याच्या दरावर होतो आणि झालेला आहे. उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने एक समिती नेमली होती. समितीने दोनशे आणि तीनशे रुपये प्रतिक्विंटल शिफारस केली होती. परंतु हे सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणारे असून त्यांना दिलासा देण्यासाठी सानुग्रह अनुदान म्हणून प्रति क्विंटल ३०० रुपये देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

Share This News

Related Post

ज्येष्ठ छायाचित्रकार मुकुंद भुते यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Posted by - November 9, 2022 0
पुणे : ज्येष्ठ छायाचित्रकार मुकुंद भुते यांचे आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वाराणसीमध्ये कुटुंबासोबत गेले असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका…

कसबा विधानसभा पोटनिवड : कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसंदर्भात आज भाजप पदाधिकाऱ्यांची पुन्हा बैठक !

Posted by - January 27, 2023 0
पुणे : पुण्यातील कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भाजपची पुन्हा बैठक होणार आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील हि बैठक घेणार असून…
Chandrapur News

Chandrapur News : खळबळजनक ! घात कि अपघात ? दोन दिवसांपासून बेपत्ता असणाऱ्या तरुणाचा अचानक आढळला मृतदेह

Posted by - October 26, 2023 0
चंद्रपूर : चंद्रपूर (Chandrapur News) जिल्ह्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. चंद्रपूर शहरात अनेक प्राचीन वास्तू आहेत. या वास्तू…
Narendra Dabholkar

डॉ. नरेंद्र दाभोलकर खून तपासाप्रकरणी सुप्रीम कोर्टाची सीबीआयला नोटीस

Posted by - May 19, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – डॉ नरेंद्र दाभोलकर (Dr. Narendra Dabholkar) यांच्या खूनाच्या प्रकरणातील तपास बंद करण्याच्या सीबीआयच्या (CBI) निर्णयाच्या…
Eknath Shinde

Eknath Shinde : ‘एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदावरुन हटवलं तर…’, ‘या’ नेत्याचे मोठे वक्तव्य

Posted by - September 22, 2023 0
मुंबई : बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्याबद्दल (Eknath Shinde) एक मोठे वक्तव्य केले आहे. “एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदावरुन हटवलं…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *