PUNE : 31 डिसेंबर रोजी कॅम्प भागात वाहतूक बदल; ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह बाबत विशेष मोहीम, वाचा कसे आहेत बदल

310 0

पुणे : वर्षअखेर आणि नववर्षारंभ साजरा करण्यासाठी शहरातील लष्कर (कॅम्प) भागातील एम.जी. रोडवर ३१ डिसेंबर रोजी नागरिकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन पुणे शहर पोलीस वाहतूक विभागाने वाहतुकीत बदल करण्यात येत असल्याचे आदेश जारी केले आहेत.

लष्कर (कॅम्प) परिसरातील रस्त्यावर ३१ डिसेंबर रोजी सायं. ५ वा. पासून ते गर्दी संपेपर्यंत अग्नीशमन वाहने, पोलीस वाहने, रुग्णवाहिका आदी अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता इतर वाहनांसाठी वाहतूकीत बदल करण्यात येत आहे.

त्यानुसार वाय जंक्शन वरून एम.जी. रोडकडे येणारी वाहतूक ही १५ ऑगस्ट चौक येथे बंद करून ती कुरेशी मस्जिद व सुजाता मस्तानी चौकाकडे वळविण्यात येणार आहे. इस्कॉन मंदिराकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, अरोरा टॉवरकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार आहे. व्होल्गा चौकाकडून महंमद रफी चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार असून ही वाहतूक सरळ ईस्ट स्ट्रीट मार्गाने इंदिरा गांधी चौकाकडे सोडण्यात येईल. इंदिरा गांधी चौकातून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार असून सदरची वाहतूक इंदिरा गांधी चौकातून लष्कर पोलीस ठाणे चौकाकडे वळविण्यात येईल. सरबतवाला चौकाकडून महावीर चौकाकडे जाणारी वाहतुक बंद करण्यात येणार असून सदरची वाहतूक ताबूत स्ट्रीटमार्गे पुढे सोडण्यात येईल.

नो-व्हेईकल झोन:
३१ डिसेंबर २०२२ रोजी रात्री ७ वा. ते १ जानेवारी २०२३ रोजी पहाटे ५ वाजेपर्यंत फर्ग्युसन रोड वर गुडलक चौक ते फर्ग्युसन कॉलेज मेनगेट पर्यंत तसेच एम.जी.रोड वर १५ ऑगस्ट चौक ते हॉटेल अरोरा टॉवर पर्यंत नो- व्हेईकल झोन घोषित करणत आला आहे.

ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह बाबत विशेष मोहीम:
३१ डिसेंबर रोजी वाहतूक शाखेतर्फे ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह बाबत विशेष मोहिम राबविण्यात येणार असुन मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या व्यक्तिंवर कारवाई करण्यात येणार आहे. तरी नागरीकांनी मद्यपान करुन वाहन चालवू नये, असे आवाहनही पुणे शहरचे पोलीस उप-आयुक्त वाहतूक विजयकुमार मगर यांनी केले आहे.

Share This News

Related Post

महत्वाची सूचना : खडकवासला धरण १०० टक्के भरले ; सांडव्यातून पाण्याच्या विसर्गात वाढ

Posted by - July 12, 2022 0
पुणे : खडकवासला धरण १०० टक्के भरले आहे. धरणाच्या सांडव्यातून पाण्याचा सुरू विसर्ग वाढवून दुपारी १ वाजता ११ हजार ९००…

अखेर…जिल्हानिहाय पालकमंत्री जाहीर; कोणत्या मंत्र्याला मिळाला कोणता जिल्हा ?

Posted by - September 24, 2022 0
मुंबई: राज्यातील अभूतपूर्व सत्ता नाट्यानंतर अखेर 30 जूनला एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ…

पत्नीने केली पतीची हत्या, रचला आत्महत्येचा बनाव

Posted by - April 8, 2022 0
पुणे – कौटुंबिक वादातून बायकोने नवऱ्याचा नायलॉनच्या दोरीने आवळून खून केल्याची घटना उघडकीस आली होती. पतीने गळफास घेतल्याचा बनाव विवाहितेने…
LokSabha

Lok Sabha Election : देशातील पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात; 21 राज्य, 102 मतदारसंघ; कुठे होणार काँटे की टक्कर?

Posted by - April 19, 2024 0
मुंबई : बहुप्रतिक्षित अशा लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा आज देशभरात पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात 21 राज्यांमध्ये मतदान होणार आहे.…

HEALTH : टॉयलेटमध्ये मोबाईल घेऊन तासभर बसता का ? जरा ही बातमी वाचाच, होऊ शकतात हे गंभीर परिणाम

Posted by - February 14, 2023 0
HEALTH : आज-काल मोबाईलचा वेड इतकं लागला आहे की अनेक जणांना टॉयलेटमध्ये जाताना मोबाईल घेऊन जाण्याची सवय असते. तुम्ही देखील…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *