जयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत बदल; वाहनतळांची जागाही निश्चित; वाचा मार्ग आणि वाहनतळ सविस्तर माहिती

267 0

पुणे : हवेली तालुक्यातील मौजे पेरणे फाटा येथे १ जानेवारी २०२३ रोजी आयोजित जयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे-अहमदनगर महामार्ग क्रमांक ६० वरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ३१ डिसेंबर २०२२ रोजी सायंकाळी ५ वाजल्यापासून ते १ जानेवारी २०२३ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत बंद करुन पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्याचे आदेश पुणे शहरचे पोलीस उप-आयुक्त वाहतूक विजयकुमार मगर यांनी जारी केले आहेत.

जयस्तंभाकडे जाणाऱ्या अनुयायींची वाहने वगळून पुण्याकडून अहमदनगर बाजूकडे जाणारी वाहतूक ही खराडी बायपास येथून उजवीकडे वळून केशवनगर मुंढवा चौक, मगरपट्टा चौक, डावीकडे वळून पुणे सोलापूर महामार्गाने केडगाव चौफुला, न्हावरा, शिरुर मार्गे नगररोड अशी जातील.

सोलापूर रोडवरून आळंदी, चाकण या भागात जाणारी वाहतूक हडपसर मगरपट्टा चौक येथे उजवीकडे वळून खराडी बायपासमार्गे विश्रांतवाडी येथून आळंदी व चाकण येथे जाईल.

मुंबई येथून अहमदनगर बाजूकडे जाणारी जड वाहने वडगाव मावळ, चाकण, खेड, मंचर, नारायणगाव आळेफाटा मार्गे अहमदनगर अशी जातील. मुंबई येथून अहमदनगर बाजूकडे जाणारी हलकी वाहने (कार, जीप) वडगाव मावळ, चाकण, खेड, पाबळ, शिरूर मार्गे अहमदनगर अशी जातील.

कोल्हापूर, सांगली, सातारा, कात्रज मार्गे मंतरवाडी फाटा, मगरपट्टा चौक येथून नगरकडे जाणारी वाहने हडपसर – पुणे सोलापूर महामार्गाने केडगाव चौफुला, न्हावरा, शिरुर मार्गे नगररोड अशी जातील.

इंद्रायणी नदीवरील आळंदी – तुळापूर हा पूल १० जानेवारी २०२२ रोजी जड वाहनांनाकरीता बंद करण्यात आला असल्याने या ठिकाणाहून केवळ अनुयायांच्या हलक्या चारचाकी वाहनांना प्रवेश दिला जाईल. अनुयायांच्या जड वाहनांनी चाकण-शिक्रापूर मार्गाचा वापर करावा.

सोहळ्यासाठी वाहनतळे निश्चित
जयस्तंभास अभिवादनासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी वाहन पार्किंगस्थळेही या आदेशानुसार निश्चित करण्यात आली आहेत. पार्किंगच्या ठिकाणापासून जयस्तंभापर्यंत जाण्यासाठी पीएमपीएमएल बसेसची सुविधा करण्यात आली आहे. त्यामुळे निश्चित करण्यात आलेल्या ठिकाणीच अनुयायांनी आपली वाहने पार्क करण्याचे आवाहनही श्री. मगर यांनी केले आहे.

पुण्याकडून येणाऱ्या नागरिकांच्या वाहनांकरिता पार्किंगची ठिकाणे:
कार पार्किंग- आपले घर शेजारी हनुमंत कंद यांचा प्लॉट तसेच संदीप सातव यांचा प्लॉट लोणीकंद, लोणीकंद बौद्धवस्ती शेजारी सागर गायकवाड यांचा प्लॉट, तुळापूर फाटा स्टफ कंपनी शेजारी मोकळा प्लॉट, सामवंशी अकॅडमी समोर थेऊर रोड, खंडाबाचा माळ

खासगी बस पार्किंग- आपले घर सोसायटीच्या मागील प्लॉट.

१ जानेवारी रोजी पुणे आणि थेऊरकडून येणाऱ्या अनुयायांच्या वाहनांची वर्दळ जास्त असल्याने लोणीकंद चौकात वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून लोणीकंदकडून खंडोबा माळ आणि सामेश्वर पार्किंगकडे जाणारा मार्ग पीएमपीएमएल बसेस वगळता इतर वाहनांसाठी एकेरी राहील.

आळंदीकडून येणाऱ्या वाहनांकरिता पार्किंगची ठिकाणे:
कार पार्किंग- तुळापूर रोड वाय पॉईंट समोरील पार्किंग, फुलगाव सैनिकी शाळा मैदान

थेऊर, सोलापूरकडून येणाऱ्या वाहनांकरिता पार्किंगची ठिकाणे:
कार पार्किंग- खंडोबाचा माळ

अष्टापूर डोंगरगावडून येणाऱ्या वाहनांकरिता पार्किंगची ठिकाणे:
कार पार्किंग- पेरणे गाव छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोरील मोकळे मैदान

दुचाकींसाठी पार्किंगची ठिकाणे:
तुळापूर फाटा संगमेश्वर हॉटेलच्या मागे मेन चौक, टाटा मोटर्स शोरुमचे मोकळे मैदान, टाटा मोटर्स शोरुमशेजारील मोकळे मैदान, पेरणे पोलीस चौकी मागील मोकळे मैदान, ज्योतिबा पार्क गो शाळेच्या शेजारील प्लॉट.

Share This News

Related Post

गणपती विसर्जन मिरवणूक : पोलीस प्रशासनाचे नियोजन फसले ? मिरवणुका वेळेत पार पाडण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत – पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता

Posted by - September 10, 2022 0
पुणे : कोरोना काळामुळे दोन वर्षानंतर पुन्हा एकदा पुण्यामध्ये गणपती उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला . कालपासून सुरू असलेल्या…
Gold Scheme

Gold Scheme : स्वस्त सोने खरेदी करण्याची सुवर्णसंधी; ‘या’ स्कीममध्ये करू शकता गुंतवणूक

Posted by - June 19, 2023 0
आजपासून स्वस्त सोने खरेदी (Gold Scheme) करण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे. सार्वभौम सुवर्ण रोखे (SGB) अंतर्गत आजपासून 23 जून पर्यंत…

शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात मतदार जागृतीसाठी तरुणाई सरसावली

Posted by - March 16, 2024 0
  पुणे दि.१५- लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाचे प्रमाण वाढावे यासाठी मतदार जागृती उपक्रमात जिल्ह्यातील तरुणाई पुढे आली आहे. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या…
Chandrayaan-3

Chandrayaan-3 : ‘हे’ आहेत चंद्रयान-3 मोहिमेचे 6 तारे; यांच्यामुळे चंद्रावर फडकणार तिरंगा

Posted by - August 23, 2023 0
पुढील काही तासांमध्ये चंद्रयान-3 (Chandrayaan-3) मोहिमेतील लँडर मॉड्यूल चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल आणि आजचा दिवस सुवर्ण अक्षरांनी नोंदवला जाईल. 23 सायंकाळी…

CHANDRASHEKHAR BAVANKULE : बारामतीच्या विजयासाठी वचनबध्द व्हा

Posted by - September 6, 2022 0
बारामती : बारामती मतदारसंघातून मागील 40 वर्षांपासून सत्ता चालविली जातेय. त्याचसाठी जनतेने मते दिली आहेत. हे मतांचे कर्ज असल्याने बारामतीचा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *