भाजप प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे ; मुंबईच्या अध्यक्षपदी आशिष शेलार यांची नियुक्ती

146 0

मुंबई : अखेर अनेक नावांच्या स्पर्धेमध्ये भाजप प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.  चंद्रकांत पाटील यांचा शिंदे सरकारमध्ये समावेश करण्यात आल्यानंतर आता भाजप प्रदेशाध्यक्षपद कोणाला मिळणार यासाठी अनेकांच्या नावांची चर्चा होती . यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह राम शिंदे यांच्या नावाची देखील जोरदार चर्चा सुरू होती . अखेर चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पद सोपवण्यात आले आहे. 

दरम्यान प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच चंद्रशेखर बावनकुळे यांनी मिशन 200 आणि 45 चा नारा दिला आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये 200 जागा तर लोकसभा निवडणुकीमध्ये 45 जिंकण्याचा आमचं मिशन असल्याचा त्यांनी म्हटले , आणि ते मिशन आम्ही पूर्ण करणारच अशी घोषणा देखील त्यांनी केली आहे.

दरम्यान मुंबईच्या अध्यक्षपदी आशिष शेलार यांची नियुक्ती करण्यात आली आहे आशिष शेलार यांची दुसऱ्यांदा मुंबई अध्यक्षपदी निवड करण्यात आली भाजप मुंबई अध्यक्ष मंगल लोढा यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडली आहे त्यामुळे त्यांचं पद रिक्त होतं त्यामुळे येत्या महापालिका निवडणुका विचारात घेता शेलार यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे

Share This News

Related Post

पेरणे फाटा येथील विजयस्तंभास अभिवादन कार्यक्रम; जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी घेतला नियोजनाचा आढावा

Posted by - December 15, 2022 0
पुणे : हवेली तालुक्यातील पेरणे फाटा येथे १ जानेवारी २०२३ रोजी होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी…

#PUNE : लोककला पथकांद्वारे शासनाच्या योजनांविषयी जनजागृती

Posted by - March 20, 2023 0
पुणे : जिल्हा माहिती कार्यालय पुणेच्यावतीने व जिल्हा नियोजन समितीच्या सौजन्याने लोककला पथकांच्या माध्यमातून अनुसूचित जाती उपयोजनाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध…
Manoj Jarange

Manoj Jarange : मनोज जरांगेच्या आंदोलनाला अंतरवली सराटीमधील नागरिकांचा विरोध

Posted by - June 3, 2024 0
जालना : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) उद्या अंतरवली सराटीमध्ये उपोषणाला बसणार आहेत. मात्र त्यागोदरच एक मोठी बातमी…
Congress MLA Arrested

Congress MLA Arrested : हिंदूंबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या ‘या’ काँग्रेस आमदाराला अटक

Posted by - November 8, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आसाम पोलिसांनी हिंदू समाजाबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या एका आमदाराला अटक (Congress MLA Arrested) केली आहे.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *