CHANDRASHEKHAR BAVANKULE : बारामतीच्या विजयासाठी वचनबध्द व्हा

290 0

बारामती : बारामती मतदारसंघातून मागील 40 वर्षांपासून सत्ता चालविली जातेय. त्याचसाठी जनतेने मते दिली आहेत. हे मतांचे कर्ज असल्याने बारामतीचा विकास झालाय. हे बारामतीवर उपकार नाहीत अशी टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. 2024 च्या निवडणुकीसाठी भाजपा कार्यकर्त्यांनी वचनबद्ध व्हावे असे आवाहनही केले.

बारामती दौऱ्यावर असलेल्या प्रदेशाध्यक्ष श्री बावनकुळे यांनी येथील मुक्ताई लॉनमध्ये भाजपा पुणे जिल्हा ग्रामीण विभागाचा संघटनात्मक आढावा त्यांनी घेतला. बारामती लोकसभा क्षेत्राचे प्रभारी श्री राम शिंदे, आ.गोपीचंदजी पडळकर, आ.राहुलजी कुल, माजी मंत्री हर्षवर्धनजी पाटील, पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष गणेशजी भेगडे, भाजयुमो प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील, भीमराव धापके, संदीप गिरे, कांचन कुल यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

बारामती लोकसभा निवडणुकीचा नारळ कन्हेरी गावातील जागृत हनुमानाचे दर्शन घेऊन फोडला. यानंतर त्यांनी काटेवाडी येथील बुथवर भेटी दिल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला माल्यार्पण केले. आहिल्यादेवी चौक ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत भाजपा रैलीत सहभागी झाले. कसबा युवा वॉरिअर्स शाखेचे उद्घाटन, भाजपा कार्यालयास भेट दिली. मारेगाव येथे बुथ स्तरीय बैठक घेतली. या सर्व ठिकाणी त्यांनी आगामी निवडणुकीसाठी तयारी करण्याचे आवाहन भाजपाच्या कार्यकर्त्यांना केले.

कॉंग्रेस-राष्ट्रवादी सोबतची शिवसेना नकली
कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या विचाराने चालणारी शिवसेना खरी असूच शकत नाही. खरी शिवसेना हिंदुत्वाची जपवणूक करणारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या नेतृत्त्वातील आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना नकली अलस्याचा टोला त्यांनी लगावला. मागील अडीच वर्षांत ओबीसी आरक्षण मविआ सरकारला टिकविता आले नाही. त्यासाठी देवेंद्र फडणवीस यांचाच पुढाकार घ्यावा लागला, असेच मराठा आरक्षणही मिळवून देणार, असेही ते म्हणाले.

बारामतीला होणार मोदींजींची सभा
बारामती लोकसभा क्षेत्राची जबाबदारी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारमनजी यांना दिली आहे. त्याचा दौरा या महिन्यात होणार आहे. खुद्द पंतप्रधान मोदी बारामतीला येणार असून ते सभा घेणार असल्याचे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. नागपूर एवढेच लक्ष बारामतीवर राहणार असल्याचे बावनकुळे यावेळी म्हणाले.

Share This News

Related Post

Pankaja Munde

Pankaja Munde : ‘अनेक वेळा नाकारलं तरी माझा…’; पंकजा मुंडेंची कार्यकर्त्यांना भावनिक साद

Posted by - September 10, 2023 0
बीड : भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी 4 सप्टेंबरपासून शिवशक्ती परिक्रमा यात्रेला सुरुवात केली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यातून…

शिवसेनेच्या वर्धापनदिनाच्या आधीच ठाकरे गटाला मोठा धक्का; शिशिर शिंदे यांचा राजीनामा

Posted by - June 17, 2023 0
मुंबई: राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली असून यामुळं शिवसेना वर्धापन दिनाअगोदरच ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.  शिशिर…
Buldhana News

Buldhana News : ट्रकला ओव्हरटेक करणे पडले महागात; पोलिस कर्मचाऱ्यासह महिला गंभीर जखमी

Posted by - June 27, 2023 0
बुलढाणा : बुलढाणामध्ये (Buldhana News) ओव्हरटेक करणे एका पोलीस कर्मचाऱ्याला महागात पडले आहे. यामध्ये (Buldhana News) समोर चाललेल्या ट्रकला ओव्हरटेक…

ऑनलाइन नोंदणी शिवाय मिळेल कोरोना लस; पुणे महापालिकेचा निर्णय

Posted by - June 4, 2022 0
पुणे- पूर्वी कोविन ॲपवर नोंदणी केल्याशिवाय कोरोना प्रतिबंधक लस मिळणं शक्य नव्हतं. परंतु, आता महापालिकेच्या निर्णयानुसार ऑनलाइन नोंदणी न करता…
Hardeepsingh Nijjar

Hardeep Singh Nijjar : कॅनडात खलिस्तानी अतिरेकी हरदीपसिंग निज्जरची गोळ्या झाडून हत्या

Posted by - June 19, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कॅनडात खलिस्तानी अतिरेकी हरदीपसिंग निज्जर (Hardeep Singh Nijjar) याची कॅनडात गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *