चंद्रकांत पाटील शाईफेक प्रकरण : आरोपींवरील अनावश्यक कलमां विरोधात ॲड. असीम सरोदे मैदानात

359 0

पुणे : भाजप नेते आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली होती मात्र याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींवर लावण्यात आलेल्या कलमांवर ॲड. असीम सरोदे यांनी आक्षेप घेतलाय. यंत्रणांच्या मदतीनं कायद्याच्या गैरवापराचं हे उदाहरण असल्याचं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.

चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक प्रकरणी मनोज घरबडे, धनंजय इजगज आणि विजय ओवाळ यांना अटक झाली होती. त्यांना 14 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीये मात्र या गुन्ह्यात लावण्यात आलेल्या कलमांवरुन आता वाद सुरू झालाय. या वादात प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी उडी घेतलीये. त्यांनी ट्वीट करत पोलिसांनी लावलेल्या कलमांवर आक्षेप घेतलाय.

‘शाइफेक प्रकरण-कलम 307 म्हणजे जीवे मारण्याचा प्रयत्न करणे व 120 ब, आर्म्स ऍक्टचा वापर अतिरेकीपणा आहे. यंत्रणांच्या मदतीनं कायद्याच्या गैरवापराचं हे उदाहरण आहे. त्यामुळे आमची लीगल टीम आरोपींची केस मोफत चालवेल. परंतु शाईफेकीचा व बेताल वक्तव्य करणाऱ्यांचा निषेध”, असं ट्विट सरोदे यांनी केलंय. तर दुसऱ्या ट्वीटमध्ये ‘मी अनावश्यक कलमांचा वापर करण्याचा विरोधात आहे. कलम 326 शस्त्राचा वापर करून गंभीर दुखापत करणे या गुन्ह्यासाठी सुद्धा 10 वर्षे किंवा जन्मठेप अशी शिक्षा होऊ शकते मग शाईफेकीसाठी कलम 307 जीवे मारण्याचा प्रयत्न हे कलम का लावायला सांगण्यात आले ? इतकाच प्रश्न आहे,’ असंही त्यांनी म्हटलंय.

चंद्रकांत पाटील शाईफेक प्रकरणात आरोपींवर लावण्यात आलेली अनावश्यक कलमं आणि 11 पोलिसांचं निलंबन या गोष्टी पाहाता यावरुन आता राजकीय वातावरण तापण्याची शक्याता वर्तवली जातेय.

Share This News

Related Post

पुणे : श्री शारदा सहकारी बँकेचे कॉसमॉस बँकेमध्ये विलीनीकरण

Posted by - November 1, 2022 0
पुणे : रिझर्व बँकेने मार्च 2021 मध्ये सहकारी बँकांच्या विलीनीकरणाबाबत परिपत्रक काढले होते त्यानुसार सहकार क्षेत्रातील देशातील कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँक…

“मुंबई महाराष्ट्राची कोणाच्या बापाची नाही !” कर्नाटक मंत्र्याच्या ‘त्या’ संतापजनक वक्तव्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संतापले

Posted by - December 28, 2022 0
नागपूर : महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादावर रोज आगीत तेल कोणी ना कोणी होतच आहे. आता कर्नाटकच्या उच्च शिक्षण मंत्री सी…

फिल्मी स्टाईल थरार; पाठलाग करत दरोडा टाकत चोरट्यांनी पळवल्या सोन्याच्या विटा

Posted by - May 28, 2023 0
पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव, ता. सातारा गावच्या हद्दीत कुरिअरच्या गाडीवर चार ते पाच जणांनी सशस्त्र दरोडा घातला. दरोडेखोरांनी गाडीतून…

‘NAAC’ कडून परीक्षक मंडळाचा विस्तार ; मूल्यांकन प्रक्रिया वेगाने राबवणे शक्य

Posted by - July 22, 2022 0
पुणे : उच्च शिक्षण संस्थांचे मूल्यांकन आणि अधिस्वीकृतीसाठीच्या परीक्षकांची संख्या राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्वीकृती परिषदेकडून (NAAC) वाढवण्यात येत आहे. बऱ्याच…

पुणे महानगरपालिका : सत्ताधारी भाजपच्या ५ वर्षाच्या कामकाजाची चौकशी CAG मार्फत करण्यात यावी ; शिवसेनेचे आंदोलन

Posted by - August 30, 2022 0
पुणे : पुणे महापालिकेच्या आवारामध्ये शिवसेनेने आज जोरदार आंदोलन केल आहे. यावेळी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि आजी-माजी नगरसेवक यांनी या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *