CHANDRAKANT PATIL : ग्रामीण भागातील PMPML ची बससेवा पुन्हा होणार पूर्ववत

152 0

पुणे : महामंडळाच्या पत्रानंतर ग्रामीण भागातील विविध मार्गांवरील पीएमपीएमएलची बससेवा टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा निर्णय पीएमपीएमएल प्रशासनाने घेतला होता. मात्र ही बससेवा पुन्हा पूर्ववत करण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पीएमपीएमएलचे अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांना दिल्या असून, त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

कोरोना काळानंतर जनजीवन पूर्वपदावर येत असताना पीएमपीएमएल प्रशासनाने ग्रामीण भागातील नागरिकांसाठी ‌अनेक मार्गांवर आपली बससेवा सुरू केली होती. मात्र जनजीवन पूर्वपदावर आल्यानंतर एसटी महामंडळाची देखील बससेवा पुन्हा सुरू झाली. त्यामुळे महामंडळाने पत्र लिहून सदर मार्गांवरील बससेवा बंद करावी; आणि आपला उत्पनाचा स्त्रोत पुन्हा देण्याची विनंती पीएमपीएमएल प्रशासनाकडे केली होती.

त्यानंतर सदर पत्राच्या अनुषंगाने पीएमपीएमएल प्रशासनाने नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस ११ मार्गांवरील बससेवा बंद करण्याचा निर्णय घेतला. तर डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला अजून १२ मार्गांवरील बससेवा बंद करण्याचा निर्णय घेतला.‌ प्रशासनाच्या या निर्णयाची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करण्यात येत होती‌. मात्र, ग्रामीण भागातील पीएमपीएमएलची बससेवा सुरू ठेवण्याची मागणी नागरिकांकडून होत होती.

त्याची दखल घेऊन पीएमपीएमएलचे संचालक ओमप्रकाश बोकोरिया यांना आज पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सदर भागातील बससेवा पूर्ववत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Share This News

Related Post

#FIRE CALL : पिरंगुटमधील सुजनील केमिको कंपनीमध्ये आगीची घटना

Posted by - February 20, 2023 0
पुणे : पिरंगुटमधील सुजल केमिको कंपनीला आज दुपारी चार वाजेच्या सुमारास आग लागली होती. दरम्यान पीएमआरडीए अग्निशमन केंद्र मारुंजी आणि…

पुणे सीमाशुल्क आयुक्तालय आणि महसूल गुप्तचर संचालनालयाकडून 2439 किलो अंमली पदार्थ नष्ट

Posted by - June 9, 2022 0
आझादी का अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने, महसूल गुप्तचर संचालनालयासह केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाच्या कार्यालयांनी 42 हजार 054 किलो पेक्षा…
Pune News

Pune News : दर्ग्यालगतचे बेकायदा बांधकाम हटवण्यासाठी PMC दाखल; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

Posted by - March 9, 2024 0
पुणे : पुण्यातल्या कसबा पेठेतील शेख सलाउद्दीन दर्ग्याच्या अनधिकृत बांधकामावर महापालिकेकडून आज कारवाई (Pune News) करण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर…

Nana Patole viral video case : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर म्हणाल्या, “राज्य महिला आयोगाकडे याबाबत तक्रार”…

Posted by - July 22, 2022 0
Nana Patole viral video case :  काही दिवसांपूर्वी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटर अकाउंट वरून एक व्हिडिओ शेअर…

समृद्धी महामार्गाचे रविवारी पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण; समृद्धी महामार्ग राज्याच्या समृद्धीची भाग्यरेषा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Posted by - December 9, 2022 0
मुंबई : महाराष्ट्राच्या समृद्धीची भाग्यरेषा असलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे रविवारी दि. ११ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *