आगामी 25  वर्षातील प्रगतीसाठी देशाला सज्ज करणारा अर्थसंकल्प -चंद्रकांत पाटील

90 0

पुणे- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा सर्वसामान्य माणसाला सोबत घेऊन देशाला आत्मनिर्भर आणि संपन्न बनविण्यासाठीचा ऐतिहासिक अर्थसंकल्प आहे. आगामी पंचवीस वर्षांतील प्रगतीसाठी देशाला सज्ज करणाऱ्या या अर्थसंकल्पासाठी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो आणि निर्मला सीतारामन यांचे अभिनंदन करतो, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.

कोरोनाच्या संकटातून बाहेर पडणाऱ्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा वेग वाढवून देशात मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती व्हावी यावर अर्थसंकल्पात भर देण्यात आला आहे. गुंतवणूक, उत्पादन, शेती, शिक्षण, सामाजिक कल्याण, ग्रामविकास, शहरांचा विकास, वैद्यकीय सुविधा अशा सर्व क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून देश आर्थिकदृष्ट्या प्रगत व्हावा आणि त्याचबरोबर स्वदेशी उद्योगांना चालना देऊन देश आत्मनिर्भर व्हावा यासाठी महत्त्वाच्या तरतुदी या अर्थसंकल्पात करण्यात आल्या आहेत.असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

पाटील म्हणाले की, डिजीटल रुपया, किसान ड्रोन्स, लष्करी उत्पादनांमध्ये आत्मनिर्भरता वाढविण्यासाठीची तरतूद, ग्रामीण आणि वंचित वर्गातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळण्यासाठी शैक्षणिक चॅनेल्स वाढविणे, डिजीटल विद्यापीठ, जमिनीची कागदपत्रे डिजिटल स्वरुपात, ई पासपोर्ट, राज्यांच्या विकासासाठी एक लाख कोटींचा निधी हे संकल्प अत्यंत कल्पक आणि उपयुक्त आहेत.

 

Share This News

Related Post

Sanjay Mandlik

Sanjay Mandlik : ‘आताचे महाराज खरे वारसदार नाहीत’; संजय मंडलिक यांचं वादग्रस्त वक्तव्य

Posted by - April 11, 2024 0
कोल्हापूर : शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. आताचे महाराज खरे वारसदार…

मुंबईमध्ये 1993 सारखा बॉम्बस्फोट घडवणार ? मुंबई पोलीस कंट्रोल रूमला आलेल्या फोनने खळबळ

Posted by - January 8, 2023 0
मुंबई : पुढच्या दोनच महिन्यात मुंबईत 1993 सारखा स्फोट होणार अशी धमकी देणारा फोन मुंबई पोलीस कंट्रोल रूमला आला आहे.…

Ajit Pawar press conference : राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा -विरोधीपक्षनेते अजित पवार (Video)

Posted by - July 25, 2022 0
मुंबई : विधिमंडळ अधिवेशन आणि मंत्रिमंडळ विस्तारावरून राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार…

आजकाल कमी वयात का येतोय हृदयविकाराचा झटका ? वाचा लक्षणे, कारणे, प्रथमोपचार आणि कशी घ्यावी काळजी

Posted by - March 13, 2023 0
हृदयविकाराचा झटका, ज्याला वैद्यकीय भाषेत मायोकार्डियल इन्फेक्शन देखील म्हणतात, जेव्हा हृदयाच्या स्नायूंच्या एखाद्या भागाला पुरेसे रक्त मिळत नाही तेव्हा उद्भवते.…
Crime

विदर्भ हादरला ! मदतीच्या बहाण्याने अंध पतीसमोरच अंध पत्नीवर अत्याचार

Posted by - April 6, 2023 0
महाराष्ट्राला हादरवणारी अत्याचाराची घटना अकोल्यातून समोर आली आहे. अंध पतीच्या समोरच अंध पत्नीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. अमरावतीहून…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *