‘आम्ही खूप प्रयत्न केले पण …’ पंकजा मुंडेंची उमेदवारी डावलल्यानंतर चंद्रकांत पाटलांची पहिली प्रतिक्रिया

224 0

मुंबई – सध्या राज्यात राज्यसभा निवडणुकीची जोरदार चर्चा सुरु आहे, शुक्रवारी राज्यसभा निवडणुकीचे मतदान होणार आहे. याकरिता सर्व पक्ष तयारीला लागले असताना, दुसरीकडे विधानपरिषद निवडणुकीच्या उमेदवारांची सुद्धा नावे जाहीर होत आहेत. भाजपकडून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपचे राज्य सरचिचणीस श्रीकांत भारतीय, माजी मंत्री राम शिंदे, महिला आघाडीच्या अध्यक्षा उमा खापरे आणि प्रसाद लाड यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. पंकजा मुंडे यांना डावलून उमा खापरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उमा खापरे यांच्या निवडीबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पंकजा मुंडेंना मोठी आशा होती की, पक्ष त्यांना विधानपरिषदेसाठी उमेदवारी देईल पण पंकजा मुंडे यांना भाजपने मोठा धक्का दिला आहे. पंकजा मुंडे आणि त्यांच्या समर्थकांसाठी खूप मोठा धक्का मानला जात आहे. पक्ष जी कामगिरी देईल ती आपण चोख बजावू असं पंकजांनी मागील आठवड्यात म्हणाल्या होत्या. तसेच आपण संधीची प्रतिक्षा करत नाही असं सुद्धा पंकजां मुंडे म्हणाल्या होत्या.

दरम्यान, पंकजा मुंडे यांना भाजपने तिकिट नाकारल्यानंतर त्यांना मोठा धक्का मानला जात आहे. तसेच पंकजा मुंडे आणि त्यांच्या समर्थकांसाठी खूप मोठा धक्का मानला जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. विधानपरिषद, विधानसभा, लोकसभा, राज्यसभा हे निर्णय केंद्र सरकार घेते. केंद्राने घेतलेला निर्णय हा सर्वांनी शिस्तबद्ध कार्यकर्ता म्हणून मान्य करायचा असतो. राजकारणात काम करणारी व्यक्ती आणि त्याच्या चाहत्यांनी इच्छा व्यक्त करायची असते. पण निर्णय हा संघटना करते.

‘पक्षश्रेष्ठी निर्णय घेत असतात. त्यामुळं तो सर्वांना मान्यच असतो. आम्ही खूप प्रयत्न केले पण शेवटी निर्णय वरिष्ठांचा !’ असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील मुंबईत पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, पंकजा ताईंच्या उमेदवारीसाठी मी तसेच देवेंद्र फडणवीस यांच्यासह आम्ही सर्वांनी खूप प्रयत्न केले. पण दिल्लीत वरिष्ठांनी भविष्याचा विचार करुन वेगळे काही तरी करण्याचा विचार असेल. नेता म्हणून किंवा कार्यकर्ता म्हणून इच्छा व्यक्त करणे, अपेक्षा व्यक्त करणे स्वाभाविक आहे. पण शेवटी निर्णय हा पक्षश्रेष्ठींचा असतो. त्यामुळं नाराज होण्याचं कारण नाही. पण आम्ही पंकजा मुंडेंच्या उमेदवारींसाठी खूप प्रयत्न केले असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

Share This News

Related Post

माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडींनी दिले पुन्हा सक्रिय राजकारणात येण्याचे संकेत

Posted by - August 5, 2022 0
पुणे: माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी १० वर्षांनी पुणे महानगर पालिकेत दाखल झाले आहेत. आता नेहमी येत जाईन, अशी प्रतिक्रियाही…
Pune News

Pune News : पुण्यातून आणखी एका दहशतवाद्याला अटक; मोठा स्फोट घडवण्याचा होता कट

Posted by - July 26, 2023 0
पुणे : पुणे पोलिसांनी (Pune News) आणखी एक मोठी कामगिरी केली आहे. पुण्यात (Pune News) स्फोट करण्याचा कट रचणाऱ्या दहशतवाद्यांना…

‘मी तोंड उघडलं तर पळता भुई थोडी होईल..’. देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरे यांना इशारा

Posted by - April 4, 2023 0
घरी बसून राजकारण करणाऱ्यांनी मला शिकवू नये. आम्ही तोंड उघडलं तर त्यांना पळता भुई थोडी होईल, असा इशारा देवेंद्र फडणवीसांनी…
Darshana Pawar Murder Case

Darshana Pawar Murder Case : प्रत्येकाच्या लाईफची एक स्टोरी आहे, पण जेव्हा आपण यशस्वी होतो ना, तेव्हा….दर्शना पवार शेवटच्या भाषणात म्हणाली…

Posted by - June 21, 2023 0
पुणे : दर्शना पवार प्रकरण (Darshana Pawar Murder Case) सध्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गाजत आहे. काही दिवसांपूर्वी MPSC परीक्षेत उत्तीर्ण…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *