चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या समस्यांविषयी रविवारी कार्यशाळा

306 0

पुणे- सहकारी गृहनिर्माण संस्थांमधील रहिवाशांना सहकार कायद्यासह आपल्या घराचे प्रॉपर्टी कार्ड तयार करुन घेणे किंवा मालकीच्या घरांसंदर्भातील इतर कागदपत्रांतील त्रुटी यांमुळे विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यासाठी कोथरुडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. आपल्या मतदारसंघातील सोसायटी आणि अपार्टमेंट भागातील नागरिकांसाठी प्रॉपर्टीकार्डसह घराच्या कागदपत्रांसदर्भातील त्रुटी दूर करण्यासाठी दिनांक २२ मे २०२२ रोजी विशेष कार्यशाळेचे आयोजन केले आहे.

पुण्याच्या वाढत्या लोकसंख्येमुळे नवीन गृहनिर्माण सोसायट्यांसह जुन्या सोसायट्यांच्या पुनर्विकासाचे प्रमाण देखील दिवसागणिक वाढत आहे. त्यासोबतच रहिवाशांचे प्रॉपर्टी कार्ड तयार करुन घेणे, सहकार कायदा व डिम्ड कन्व्हेयन्स, सोसायटींचा पुनर्विकास व स्वयं पुनर्विकास यांमध्ये बदलत्या काळानुसार कायद्यातील सुधारणांमुळे नागरिकांना ज्या समस्यांचा समाना करावा लागत आहे.

त्यामुळे या समस्यांचे निराकरण करण्याच्यादृष्टीने भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिनांक २२ मे २०२२ रोजी सकाळी ९ ते दुपारी १ यावेळेत बाल शिक्षण मंदिर येथे कोथरुडकरांसाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन केले आहे. या कार्यशाळेत माजी सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी, प्रसिद्ध वास्तूविशारद चंद्रशेखर प्रभू मार्गदर्शन करणार आहेत. तसेच या कार्यक्रमास पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण महासंघाचे अध्यक्ष सुहास पटवर्धन हे अवर्जून उपस्थित राहणार आहेत. या कार्यशाळेत उपस्थितांपैकी काही नागरिकांच्या प्रश्नांना तज्ज्ञ व्यक्ती उत्तरे देणार आहेत.

 

 

Share This News

Related Post

पुणे : 1 कोटी विद्यार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षण , कार्यानुभव आणि नोकरीची संधी

Posted by - July 20, 2022 0
पुणे : केंद्रीय शिक्षण मंत्रालय आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेकडून (एआयसीटीई) देशभरातील एक कोटी विद्यार्थ्यांना कौशल्य, कार्यानुभव आणि नोकरीची संधी…

#VIDEO : अभिनेत्री सोनाली कुलकर्णी म्हणते, ” भारतातल्या मुली आळशी, त्यांच्या अपेक्षा अवाजवी…!” तुमचं मत काय ?

Posted by - March 16, 2023 0
काळ बदलला तसं मुली देखील स्वतः कमावून आणि घराला हातभार लावणं यास महत्त्व देतात. एकीकडे मुलींनी वेळेत लग्न करावं, मुलं…

तेच मैदान तीच वेळ; उद्धव ठाकरेंच्या सभेला एकनाथ शिंदे देणार प्रत्युत्तर

Posted by - March 19, 2023 0
रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची जंगी सभा झाली. या बैठकीला उत्तर देण्यासाठी शिंदे गटाने खेड…

Ayushman Bharat Health Card : ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था आणखी बळकट करणार ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन

Posted by - October 4, 2022 0
मुंबई : ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे…

MURDER CASE INDAPUR : संतापजनक; वडिलांवरचा राग काढण्यासाठी 4 वर्षाच्या मुलावर घातला ट्रॅक्टर, आणि मग…

Posted by - October 27, 2022 0
इंदापूर : जमिनीच्या वादातून वडिलांशी असलेल्या वैराचा संताप अनावर होऊन बदला घेण्याच्या द्वेषाने एका नराधमाने चार वर्षाच्या चिमुकल्यावर ट्रॅक्टर घालून…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *