पंतप्रधान मोदींच्या हस्ते पुण्यातील सीबीआयच्या इमारतीचे आज उद्घाटन, दिल्लीतून ऑनलाइन उद्घाटन करणार

332 0

पुण्यातील येरवडा येथे केंद्रीय अन्वेषण ब्युरोच्या (सीबीआय) नव्याने बांधलेल्या कार्यालयीन इमारतीचे उद्‍घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज सोमवारी (ता. ३) होणार आहे. पुणे, शिलाँग आणि नागपूर येथे सीबीआयच्या नवीन कार्यालयीन इमारतीचे पंतप्रधान मोदी ऑनलाइन उद्घाटन करतील, असे पंतप्रधान कार्यालयाच्या पत्रकात म्हटले आहे.

पंतप्रधान मोदी हे सोमवारी नवी दिल्लीतील विज्ञान भवनात केंद्रीय अन्वेषण ब्युरोच्या हीरक महोत्सवी सोहळ्याचे उद्घाटन करणार आहेत. कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलिस पदक आणि सीबीआयच्या सर्वोत्तम तपास अधिकाऱ्यांना सुवर्णपदक प्रदान करतील. या वेळी पुणे, शिलाँग आणि नागपूर येथे सीबीआयच्या नवीन कार्यालयीन इमारतीचे पंतप्रधान मोदी ऑनलाइन उद्घाटन करतील. पंतप्रधान सीबीआयच्या ट्विटर हँडलचे उद्घाटन करतील. तसेच, सीबीआयच्या हीरक महोत्सवी वर्षाचे औचित्य साधणारे टपाल तिकीट आणि स्मृती नाणे जारी करणार आहेत.

सध्या पुणे सीबीआयचे कामकाज आकुर्डी, पिंपरी येथील कार्यालयातून सुरू होते. आता येरवड्यातील फुलेनगर-आळंदी रस्त्यावरील मेंटल हॉस्पिटलजवळ सीबीआयसाठी आरक्षित जागेवर नवीन तीन मजली कार्यालय आणि अधिकाऱ्यांसाठी निवासी संकुल बांधण्यात आले आहे. या प्रकल्पावर सुमारे २० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.

Share This News

Related Post

चिमणी उड, कावळा उड, पोपट उड, बस उड…(संपादकीय)

Posted by - September 3, 2022 0
आपल्यापैकी सर्वांनीच बालपणी एक खेळ खेळलाय. गोल रिंगण खालून बसायचं… हात जमिनीवर ठेवायचा आणि त्यातल्या एका बोटाला कुणीतरी एकानं उडण्याचा…

मोठी बातमी : रस्ता ओलांडताना प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांचा अपघात; डोक्याला जबर मार

Posted by - January 11, 2023 0
अमरावती : प्रहार संघटनेचे नेते माजी मंत्री बच्चू कडू यांचा आज सकाळी रस्ता ओलांडताना मोठा अपघात झाला आहे. आज सकाळी…

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ‘सायन्स पार्क’ आता स्वतंत्र इमारतीत

Posted by - February 27, 2022 0
लहान व किशोरवयीन मुलामुलींना विज्ञानाची गोडी लागावी व कुतूहल निर्माण व्हावे या हेतूने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने २०१४ साली सुरू…
Aaditya Thackeray

Aaditya Thackeray : माझ्या नावापुढे बाळ जोडलं त्याचा अभिमान वाटतो कारण..; आदित्य ठाकरेंचा भाजपला टोला

Posted by - October 1, 2023 0
मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जपान दौऱ्यावरून सध्या राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aaditya…

ब्रेकिंग न्यूज, उद्योजक पद्मश्री राहुल बजाज यांचे निधन

Posted by - February 12, 2022 0
पुणे- प्रसिद्ध उद्योजक पद्मश्री राहुल बजाज यांचं वयाच्या 83 व्या वर्षी निधन झाले आहे. बजाज हे गेल्या काही काळापासून कर्करोगाने…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *