खासदार संजय राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल ; काय आहे प्रकरण ? वाचा सविस्तर

523 0

ठाणे : खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात गंभीर आरोप केले आहेत. खासदार श्रीकांत शिंदे यांनी हल्ला करण्यासाठी ठाण्यातील एका गुंडास सुपारी दिली असल्याचे थेट पत्रच त्यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना दिले होते. यानंतर आता संजय राऊत यांनी श्रीकांत शिंदे यांची प्रतिमा मलीन करण्याचा डाव असल्याचा आरोप मीनाक्षी शिंदे यांनी केला आहे.

दरम्यान संजय राऊत यांच्या विरोधात कापूर बावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संजय राऊत यांनी पत्रात लिहिले होते की, ठाण्यातील एक कुख्यात गुंड राजा ठाकूर यास माझ्याव हल्ला करण्याची सुपारी श्रीकांत शिंदे यांनी दिली असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. यावर आता ठाणे पोलिसांनी थेट नाशिकमध्ये जाऊन संजय राऊत यांचा जबाब देखील नोंदवून घेतला आहे. संजय राऊत सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत.

काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “सहानुभूती मिळवण्यासाठी हा सर्व खटाटोप सुरू आहे. श्रीकांत शिंदे यांच्यावर संजय राऊत यांनी केलेले धमकीचे आरोप हे फक्त कायदा सुव्यवस्था बिघडवण्यासाठी आणि स्वतःला प्रसिद्धी मिळवण्यासाठी केलेला स्टंट आहे. याची सखोल चौकशी गृह विभागामार्फत होईल.” असं यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केला आहे.

Share This News

Related Post

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाची लागण (व्हिडिओ)

Posted by - January 24, 2022 0
मुंबई- मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोना रूग्णसंख्या वाढत असून नेते-अभिनेत्यांपासून ते सर्वसामान्य नागरिक देखील कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. त्यातच आता…
Gadchiroli Murder Case

Gadchiroli Murder Case : गडचिरोलीतील ‘त्या’गूढ हत्येचं रहस्य उलगडलं; ‘या’ कारणामुळे सुनेनंच घडवून आणलं हत्याकांड

Posted by - October 18, 2023 0
गडचिरोली: गडचिरोलीमधील (Gadchiroli Murder Case) महागाव येथील एकाच परिवारातील पाच व्यक्तींच्या मृत्यूचे रहस्य उलगडण्यास गडचिरोली पोलीसांना यश आलं आहे. या…

मोठी बातमी! जितेंद्र आव्हाड देणार आमदारकीचा राजीनामा; स्वतः आव्हाडांनी ट्विट करून दिली माहिती

Posted by - November 14, 2022 0
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचं ट्वीट केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.…

#BJP HEMAT RASANE : भाजपकडून कसबा पोटनिवडणुकीसाठी तिकीट जाहीर झालेले हेमंत रासने यांचा संपूर्ण परिचय

Posted by - February 4, 2023 0
पुणे : पुण्यातील कसबा मतदार संघाची भाजपची उमेदवारी आज जाहीर झाली असून, कसबा पोटनिवडणुकीसाठी पुणे महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष राहिलेले…

आमदार गोपीचंद पडळकर यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र, केली ‘ही’ मागणी

Posted by - June 2, 2022 0
सांगली – भाजपचे आमदार पडळकर यांनी अहमदनगरच्या नामांतरासंबंधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठविले आहे. अहमदनगरचे नाव बदलून ‘अहिल्यानगर’ करण्यात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *