मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांच्यावर आक्षेपार्ह टिपण्णी करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल !

306 0

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ट्विटच्या माध्यमातून आक्षेपार्ह टिपण्णी करणाऱ्याविरोधात सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात युवा सेनेचे सचिव किरण साळी यांनी फिर्याद दिली असून @bhujangashetti या ट्विटर हॅंडलच्या चालकावर भादवि कलम १५३ (अ), ५००, ५०५ (२) अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साळी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सदरील ट्विटर हॅंडलने समाजात असंतोष निर्माण होईल, या उद्देशाने ११ ते १४ ऑक्टोबर, २०२२ दरम्यान आक्षेपार्ह, महिलांना अपमानास्पद, लज्जास्पद आणि आपत्ती निर्माण होईल, असा मजकूर पोस्ट केलेला आहे’.

या संदर्भात माहिती देताना देताना साळी म्हणाले, ‘मुख्यमंत्र्यांविरोधातील आक्षेपार्ह टीका आम्ही कोणत्याही परिस्थितीत सहन करणार नाही. त्यांना कडक कायदेशीर भाषेतच उत्तर दिले जाईल. समाजात द्वेष निर्माण करण्यासाठी काही घटक यात जाणीवपूर्वक मुख्यमंत्र्यांची बदनामी करत असण्यातच शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा समाजकंटकांवर पोलिसांनी कडक कारवाई करावी’.

महाराष्ट्र सायबर अधिक्षकांकडे कडक कारवाईची युवा सेनेची मागणी

सायबर पोलीसांत गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी युवा सेना सचिव किरण साळी यांनी राज्याच्या सायबर सेलचे पोलीस अधिक्षक संजय शिंत्रे यांच्याकडे केली आहे. कारवाईच्या मागणीचे पत्र साळी यांनी शिंत्रे यांना दिले असून दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन शिंत्रे यांनी दिले आहे.

Share This News

Related Post

जालना येथून बेपत्ता झालेले पोलीस निरीक्षक संग्राम ताटे शिरवळमध्ये बेशुद्धावस्थेत सापडले

Posted by - February 14, 2022 0
जालना- तब्बल 13 दिवसांपूर्वी जालना येथून बेपत्ता झालेले जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक संग्राम ताटे शिरवळ येथे सापडले…
Gujrat Viral Video

Gujrat Viral Video : जय श्रीरामचा नारा देण्यास सांगत टोळक्याकडून मुस्लिम तरुणाला बेदम मारहाण

Posted by - August 4, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गुजरातमध्ये (Gujrat Viral Video) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये जय श्री रामचा नारा देण्यास…
Viral Video

गैरवर्तन करणाऱ्या वृद्धाला तरुणीने भर रस्त्यात दिला चोप ( Video)

Posted by - May 19, 2023 0
मुंबई : आपल्या देशाने कितीही प्रगती केली तरी महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत. पोलीस प्रशासन 24 तास तैनात असताना…
Maharashtra Politics

Maharashtra Politics : मविआमध्ये विधानसभेच्या ‘एवढ्या’ जागा लढवणार; संभाजी ब्रिगेडकडून करण्यात आली घोषणा

Posted by - May 31, 2024 0
पुणे : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात (Maharashtra Politics) आली आहे. लोकसभेच्या सहा टप्प्यांसाठी मतदान झालं आहे. तर सातव्या…

पुण्यात गणेशोत्सव काळात पादचाऱ्यांसाठी एकेरी व दुहेरी मार्ग ; वाहतूक विभागाने काय केले बदल ? पाहा

Posted by - September 1, 2022 0
पुणे : गणेशोत्सवामुळे होणारी गर्दी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक विभागाकडून 1 ते 9 सप्टेंबरपर्यंत पादचाऱ्यांसाठी मार्गात बदल केले आहेत.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *