नवीन कात्रज बोगदा ते वारजे दरम्यान दोन्ही बाजूच्या सेवा रस्त्यांवर असलेले अनाधिकृत अतिक्रमण काढण्याचे आवाहन

207 0

पुणे : भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण पुणे यांच्या अधिकार क्षेत्रामधील राष्ट्रीय महामार्गाच्या हद्दीमध्ये राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ वरील नवीन कात्रज बोगदा ते वारजे दरम्यान दोन्ही बाजूच्या सेवा रस्त्यांवर असलेले अनाधिकृत अतिक्रमण काढण्याचे आवाहन प्राधिकरणातर्फे करण्यात आले आहे.

अतिक्रमणामुळे रा.म.क्र. ४ वरील अपघाताचे प्रमाण वाढले आहे. विभागीय आयुक्त पुणे, पोलीस आयुक्त पुणे शहर, आयुक्त पुणे महानगरपालिका व प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक यांच्या २१ नोव्हेंबर रोजी झालेल्या बैठकीत ठरल्यानुसार या सेवा रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गाच्या हद्दीमध्ये व दोन्ही बाजूच्या सेवा रस्त्यालगतच्या मिळकतधारकांनी अनधिकृतपणे केलेले अतिक्रमण व विना परवाना बांधकाम स्वखर्चाने त्वरीत काढून घ्यावे.

राष्ट्रीय महामार्गाच्या हद्दीमध्ये नवीन कात्रज बोगदा ते वारजे दरम्यान दोन्ही बाजूच्या सेवा रस्त्यांवर अस्तित्वातील असलेल्या सेवा वाहिन्या (पाणी पुरवठा, टेलीफोन, विद्युत वाहीनी, ओएफसी केबल्स इ.) संबंधित यंत्रणेने त्वरीत स्वखर्चाने काढून घ्याव्यात. अतिक्रमण काढताना काही नुकसान किंवा असुविधा झाल्यास भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण पुणे जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.

सदर अतिक्रमण भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण पुणे यांच्यावतीने दि कन्ट्रोल ऑफ नॅशनल हायवेज (लॅन्ड अॅन्ड ट्राफिक) अॅक्ट २००२ अन्वये निष्कासीत करण्यात येतील व त्याचा खर्च व दंड संबधीत धारकाकडून वसूल करण्यात येईल, असे प्रकल्प संचालक एस. एस. कदम यांनी कळविले आहे

Share This News

Related Post

मास्क लावून, हुडी घालून एटीएम फोडले, पण पोलिसांच्या नजरेतून नाही सुटले

Posted by - February 15, 2022 0
पिंपरी- स्वतःची ओळख लपवण्यासाठी तोंडावर मास्क लावून, अंगात हुडी घालून, शिवाय डोक्यावर रुमाल टाकून एटीएम फोडण्याचा प्रयत्न दोन चोरटयांनी केला…

मोठी बातमी : जितेंद्र आव्हाड यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; वाचा सविस्तर प्रकरण

Posted by - November 12, 2022 0
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ठाणे पोलिसांनी…

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2022 : विजयादशमी निमित्त खोखो खेळाडू संघांनी लुटले सुवर्ण ! खोखो स्पर्धेत महाराष्ट्राचा गोल्डन धमाका

Posted by - October 4, 2022 0
अहमदाबाद : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिला आणि पुरुष संघांनी दस-याच्या पू्र्वसंध्येला सुवर्णपदक जिंकून विजयादशमीचे सोने लुटले. दोन्ही गटात निविर्वाद…

पुण्यात १३ वर्षाच्या विद्यार्थिनीवर बलात्कार, शाळेच्या बाथरूममध्ये केले घृणास्पद कृत्य

Posted by - March 24, 2022 0
पुणे- पुण्यात एका १३ वर्षाच्या विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ओळख असल्याचा बहाणा करून एका अज्ञात व्यक्तीने…

एमआयएम महाविकास आघाडी सोबत येणार ? ; राज्यात राजकीय चर्चेला उधाण

Posted by - March 19, 2022 0
राज्याच्या राजकारणात आता नव्या समिकरणांची जोरकस चर्चा सुरु झाली आहे. विशेष म्हणजे ही चर्चा दोन भिन्न विचारसरणीच्या राजकीय पक्षांमध्ये आहे.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *