कलकत्ता उच्च न्यायालयाचा मोठा निर्वाळा; ‘वंध्यत्व’ घटस्फोटाचा आधार होऊ शकत नाही !

1033 0

कलकत्ता : आजच्या युगात देखील वंध्यत्वामुळे अनेक गुन्हेगारी वृत्त उजेडात येत आहेत. काळी जादू ,आघोरी पूजा ,हत्या अशा गुन्ह्यांसह मूल होत नाही म्हणून पत्नीला डिव्होर्स देखील दिले जातात. पण आता कलकत्ता उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्वाळ्यानुसार व्यंधत्व हा घटस्फोटाचा आधार असू शकत नाही.

कलकत्ता उच्च न्यायालयामध्ये पतीने दाखल केलेली घटस्फोटाची याचिका कलकत्ता उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. सहा वर्षांपूर्वी लग्न झालेल्या या जोडप्याने घटस्फोटासाठी याचिका दाखल केली होती. यामध्ये पत्नी कधीही आई होऊ शकत नाही ,म्हणून पतीला डिव्होर्स घ्यायचा होता. ही याचिका कोर्टात दाखल केल्यानंतर पत्नीने बेलिया घाटा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पत्नीने पती विरुद्ध मानसिक शारीरिक छळ आणि क्रौर्य या कलमान्वये गुन्हा दाखल केला होता.

पत्नीच्या अचानक मासिक पाळी थांबल्यामुळे तिचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य खचले होते. याप्रकरणी न्यायमूर्ती शंपा दत्त यांच्या कोर्टाने दिलेल्या निर्वाळ्यानुसार, पालक होण्यासाठी अनेक पर्याय आहेत. या परिस्थितीत जीवनसाथीला समजून घेणे आवश्यक आहे. कारण एकच जोडीदार दुसऱ्या जोडीदाराला मानसिक शारीरिक ताकद परत मिळवून देण्यासाठी मदत करू शकतो. या महिलेवर आता बेंगळुरू येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्युरोसायन्स मध्ये उपचार सुरू आहेत.

Share This News

Related Post

एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत शिवसेनेच्या 12 खासदारांची घेतली भेट 

Posted by - July 19, 2022 0
नवी दिल्ली – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिल्लीत शिवसेनेच्या (शिंदे गट) 12 खासदारांची भेट घेतली आहे. एकनाथ शिंदे…

#CRIME NEWS : हैदराबाद मधून पुण्याचे गुगल ऑफिस उडवून देण्याचा धमकीचा फोन; विक्षिप्तपणाचा कळस !

Posted by - February 13, 2023 0
पुणे : पुण्यातील गुगलचे ऑफिस बॉम्बने उडून देण्याच्या धमकीच्या फोन नंतर पुण्यात एकच खळबळ उडाली होती. कोरेगाव पार्कमध्ये असलेल्या गुगल…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांना श्रद्धांजली

Posted by - November 30, 2022 0
मुंबई : ‘समाजजीवनाशी एकरूप होऊन आपल्या लेखनातून मराठी साहित्यात मोलाची भर घालणारा स्वतंत्र प्रतिभेचा, कृतीशील साहित्यिक गमावला आहे, अशा शब्दांत…

आपल्या वक्तव्यातून वाद निर्माण होईल, अशी वक्तव्ये टाळावी – अजित पवार

Posted by - May 1, 2022 0
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबादेत सभा होणार आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर विविध नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत .जातीय, धार्मिक सलोखा…

भाजपा आमदार गिरीश महाजन यांची सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्याविरोधात पुणे पोलिसांत तक्रार

Posted by - March 23, 2022 0
भाजपचे आमदार गिरीश महाजन यांनी तत्कालीन विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्या विरोधात पुण्यातील शिवाजीनगर पोलीस  ठाण्यात लेखी तक्रार    दाखल…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *