मंत्रिमंडळ बैठक निर्णय : राज्यातील 846 शाळांचा पीएम श्री योजनेत सर्वांगीण विकास करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

564 0

मंत्रिमंडळ बैठक निर्णय : राज्यातील ८४६ शाळांचा सर्वांगीण विकास करणाऱ्या पीएम श्री योजनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

देशभरात पहिल्या टप्प्यात १५ हजाराहून अधिक शाळा उच्च दर्जाचे गुणात्मक शिक्षण देणाऱ्या सर्वोत्कृष्ट शाळा म्हणून विकसित करण्यात येणार असून यात राज्यातील ८४६ शाळांचा समावेश करण्यात येईल.

पीएम श्री योजनेत सहभागी होण्यासाठी राज्य शासनाने केंद्रासमवेत सामंजस्य करार केला आहे. या करारानुसार राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० राज्यात लागू करण्यात येईल. पीएम श्री योजनेत केंद्राचा ६० टक्के हिस्सा असेल. प्रत्येक शाळेसाठी १ कोटी ८८ लाख एवढी तरतूद ५ वर्षांसाठी करण्यात येईल. या शाळांसाठी ५ वर्षांकरिता केंद्राचा हिस्सा ९५५ कोटी ९८ लाख राहणार असून राज्याचा ४० टक्के हिस्सा प्रती शाळा ७५ लाख प्रमाणे ६३४ कोटी ५० लाख खर्च अपेक्षित आहे. या योजनेतील दुसऱ्या टप्प्यात ४०८ गट, २८ महानगरपालिका आणि ३८३ नगरपालिका व नगरपरिषदा यामधून पीएम श्री शाळांची निवड केली जाईल.

या शाळांमधून अनुभवात्मक पद्धतीने आनंददायी शिक्षण देण्यात येईल. विद्यार्थ्यांची वैचारिक समज आणि वास्तविक जीवनातील त्याचा ज्ञानाचा वापर आणि योग्यतेवर आधारित मुल्यांकन करण्यात येईल. या शाळांमध्ये माजी विद्यार्थ्यांना देखील सहभागी करून घेऊन विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन व शैक्षणिक मदत करण्यात येईल. काही कारणांमुळे विद्यार्थ्यांची शाळेतून गळती झाल्यास त्यांना पुन्हा प्रवेश देऊन अशा मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यात येईल.
या शाळांचा विकास प्रामुख्याने पुढील ६ प्रमुख आधार स्तंभांवर केला जाईल. अभ्यासक्रम, आध्यापन शास्त्र व मुल्यमापन; प्रवेश आणि पायाभूत सुविधा; मानव संसाधन आणि शालेय नेतृत्व; समावेशक पद्धती आणि लाभार्थी समाधान; व्यवस्थापन, देखरेख आणि प्रशासन; लाभार्थी समाधान.

या योजनेची अंमलबजावणी राज्य स्तरावरून शालेय शिक्षण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समिती, जिल्हा स्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समिती आणि महापालिका स्तरावर महानगरपालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समित्यांमार्फत केली जाईल. राज्य प्रकल्प संचालक हे राज्य अंमलबजावणी समितीचे अध्यक्ष असतील.

Share This News

Related Post

राज ठाकरेंच्या निवासस्थानी आज नारायण राणेंनी घेतली भेट; चर्चेचा विषय मात्र गुलदस्त्यात

Posted by - December 31, 2022 0
मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सपत्नीक मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ…

ऊस तोडणी कामगार मुकादम व वाहन मालक यांचा 20 सप्टेंबरला पुणे येथील साखर आयुक्त कार्यालयावर धडक मोर्चा…

Posted by - September 19, 2022 0
पुणे : राज्यातील ऊस तोडणी कामगार मुकादम व वाहन मालक यांचा 20 सप्टेंबरला साखर आयुक्त कार्यालय पुणे येथे धडक मोर्चा…

शैक्षणिक : सर्व विद्यापीठांचे एकत्रित वेळापत्रक जाहीर करणार – उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील

Posted by - December 31, 2022 0
नागपूर : राज्यातील सर्व विद्यापीठांच्या परीक्षांचे, निकाल लागण्याचे एकत्रित वेळापत्रक तयार करुन जाहीर करण्यात येईल, असे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री…

चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या समस्यांविषयी रविवारी कार्यशाळा

Posted by - May 18, 2022 0
पुणे- सहकारी गृहनिर्माण संस्थांमधील रहिवाशांना सहकार कायद्यासह आपल्या घराचे प्रॉपर्टी कार्ड तयार करुन घेणे किंवा मालकीच्या घरांसंदर्भातील इतर कागदपत्रांतील त्रुटी…

महत्वाची सूचना : पुण्यात पुढील दोन दिवस ‘या’ भागांत पाणीपुरवठा बंद

Posted by - November 29, 2022 0
पुणे : पुण्यात दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पुणे महानगरपालिकेनं शहरातील पाच महत्त्वाच्या भागांमध्ये पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *