#कसबा पोटनिवडणूक : कसबा पेठ मतदार संघातील उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची दुसरी तपासणी पूर्ण

567 0

पुणे : कसबा पेठ विधानसभा मतदार संघ पोटनिवडणूकीच्या अनुषंगाने उमेदवारांच्या दैनंदिन निवडणूक खर्चाची दुसरी तपासणी निवडणुक निर्णय अधिकारी कार्यालयात करण्यात आली.

भारत निवडणुक आयोगाच्या निवडणुक खर्च संनियंत्रण संदर्भातील तरतूदीनुसार उमेदवाराने ठेवलेल्या दैनंदिन खर्चविषयक तपासणी केली जात आहे. या तपासणीचा दुसरा टप्पा २० फेब्रुवारी रोजी पार पडला. उमेदवारांच्या निवडणूक प्रचार खर्चाच्या तपासणीचे निरीक्षण निवडणूक खर्च निरीक्षक मंझरुल हसन यांच्यामार्फत करण्यात येत आहे. सहायक खर्च निरीक्षक म्हणून सुधीर पलांडे हे भूमिका बजावत आहेत.

खर्चाच्या तपासणीकरिता खर्च तपासणी कक्ष स्थापन करण्यात आला त्याच्या पथकप्रमुख लेखा अधिकारी नंदा हंडाळ आहेत. उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यापासून निवडणूक निकाल जाहीर होईपर्यंतच्या खर्चाचे सनियंत्रण या कक्षाकडून करण्यात येत आहे.

उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाची पहिली तपासणी १५ फेब्रुवारी रोजी पार पडली आहे. तिसरी तपासणी २४ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या विहित वेळेत पार पडणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहा किसवे- देवकाते यांनी दिली.

Share This News

Related Post

Beed News

Beed News : बीड हादरलं ! डोक्यात दगड घालून शाळेतील शिपायाची निर्घृणपणे हत्या

Posted by - July 21, 2023 0
बीड : सध्या राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण खूप वाढले आहे. बीडमधून (Beed News) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये शाळेतील…
Pune News

Pune News : निवडणूक निरीक्षक प्रसाद लोलयेकर यांनी केली मतदान केंद्रांची पाहणी

Posted by - May 1, 2024 0
पुणे : पुणे लोकसभेसाठी (Pune News) भारत निवडणूक आयोगाकडून नियुक्त सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक प्रसाद लोलयेकर यांनी पुणे कँटोंमेन्ट विधानसभा मतदारसंघातील…

चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत पहिल्या उमेदवाराची एन्ट्री

Posted by - September 26, 2022 0
पुणे : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणूकीचा कार्यक्रम धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून येत्या मंगळवारी जाहीर होणार आहे . दोन गटात…
Ajit Pawar And Devendra Fadanvis

Maratha Aarakshan : ‘कार्तिकी महापूजेला आल्यास उपमुख्यमंत्र्यांच्या तोंडाला काळे फासू…’, मराठा समाजाने दिला इशारा

Posted by - October 28, 2023 0
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिर्डीतील सभेत मराठा आरक्षण (Maratha Aarakshan) व मराठा समाजाबद्दल एक अक्षरही काढले नाही. यावरून…

चांदिवाल आयोगाची देशमुखांना क्लिनचिट ? 100 कोटींच्या वसुलीचे आरोप खोटे

Posted by - April 26, 2022 0
मुंबई – चांदीवाल आयोगाकडून अनिल देशमुख यांना क्लीनचिट देण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *