नवीन घर खरेदी करताय; तर ही आहे तुमच्या कामाची बातमी

386 0

आता घर खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी अडकून पडलेले लाखो गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकार निधी देणाऱ्या त्यामुळं घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळेल.

अडकलेल्या घरबांधणी प्रकल्पामुळं घर खरीददारांची ससेहोलपट होते. अनेक घर खरेदीदारांना पैसे भरूनही घरे मिळालेली नाहीत. या लोकांना घर भाडे आणि घराच्या कर्जाचा हप्ता असा दुहेरी भुर्दंड सहन करावा लागत आहे.
अशा प्रकल्पांसाठी केंद्रानं अलीकडेच रिझर्व बँक आणि बँकांची बैठक घेतली अनेक बँकांनी अशा मालमत्तांवरील आपला पहिला हक्क सोडण्याची तयारी दर्शवीली आहे. त्यामुळे हे प्रकल्प नव्या विकासकांना हस्तांतरित करणे सुलभ होइल तसेच विकासकां दिलेल्या पैशांचीही वसुली होइल. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी स्वामीह 2 योजनेला आणखी निधी देण्याचा विचार सरकार करीत आहे. त्यासाठी हितधारक, बँक आणि नियामक यांच्याशी चर्चा करत आहेत.

4.80 लाख गृहनिर्माण प्रकल्प बांधकामांच्या वेगवेगळ्याटप्प्यात अडकून पडलेत तर 4.48 लाख कोटी रुपये या प्रकल्पात अडकलेत यातील 77 टक्के प्रकल्प दिल्ली एनसीआर आणि मुंबई मधील आहेत.तर एकूणच कुठे किती प्रकल्प अडकले आहेत. जाणून घेऊयात

दिल्ली-एनसीआर 2 लाख 40 हजार 610

मुंबई महानगर क्षेत्र
1 लाख 28 हजार 870

पुणे
44 हजार 250

बंगळुरू
26 हजार 30

कोलकाता
23 हजार 540

हैदराबाद
11 हजार 450

चेन्नई
5 हजार 190

अडकलेल्या प्रकल्पांसाठी केंद्र सरकार निधी देणार असल्यामुळं घर खरेदी करणाऱ्यांना सरकारकडून दिलासा मिळालाय

Share This News

Related Post

नक्षलवादी हल्ला : महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवर नक्षलवाद्यांचा गोळीबार; दोन जवान शहीद, एक जखमी

Posted by - February 20, 2023 0
छत्तीसगड : आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार, छत्तीसगडच्या राजनांदगाव या ठिकाणी नक्षलवाद्यांनी गोळीबार केला आहे. या गोळीबारामध्ये दोन जवान शहीद झाले असून,…

बहीण म्हणून वसंत मोरेंच्या पाठीशी, रुपाली पाटील यांच्याकडून पाठराखण

Posted by - April 6, 2022 0
पुणे – राज ठाकरे यांच्या मशिदीवरील भोंग्याच्या भूमिकेनंतर पुण्यातील मनसेच्या स्थानिक नेत्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. काही मुस्लिम कार्यकर्त्यांनी…

Excise and Service Tax Appellate Tribunal : रेस्टॉरंट्सद्वारे विकल्या जाणाऱ्या पार्सल खाद्यपदार्थांवर सेवा कर आकारला जाऊ शकत नाही; वाचा हे नियम

Posted by - February 18, 2023 0
कस्टम्स, एक्साइज अँड सर्व्हिस टॅक्स अपीलल ट्रिब्युनलने (सीईएसटीएटी) नुकतेच म्हटले आहे की रेस्टॉरंट्सद्वारे विकल्या जाणाऱ्या टेक-अवे / पार्सल खाद्यपदार्थांवर सेवा…

#Pune : तरुणाचे व्यायाम करून झाल्यानंतर फोनवर बोलत असताना दुर्दैवी निधन; मृत्यूचे कारणही आहे धक्कादायक ;नक्की जबाबदार कोण ?

Posted by - March 21, 2023 0
पुणे : ओपन जिममध्ये व्यायाम केल्यानंतर फोनवर बोलत असताना तरुणाचा दुर्दैवी अंत झाला. अमोल शंकर नाकते (वय २१ वर्ष) या…
stock market

Share Market Updates : लोकसभेच्या निकालादरम्यान शेअर मार्केट मध्ये मोठी घसरण

Posted by - June 4, 2024 0
मुंबई : सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. दुपारपर्यंत देशातील बहुसंख्य जागांवरील कल स्पष्ट होणार आहेत. त्यचा परिणाम भारतीय…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *