मंत्रिमंडळ बैठकीतील संक्षिप्त निर्णय

317 0

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात ७५ हजार पदांची भरती प्रक्रियेला गती देणार

(सामान्य प्रशासन विभाग)

दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग स्थापन करणार.
३ डिसेंबरपासून विभाग कार्यरत

( सामाजिक न्याय विभाग)

अधिसंख्य पदावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सेवाविषयक लाभ देणार.
अनुसूचित जमातीची रिक्त पदे तत्काळ भरण्याची कार्यवाही करणार

( सामान्य प्रशासन विभाग)सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद हा नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्ग फास्ट ट्रॅकवर. राज्य शासनाची ४५२ कोटी ४६ लाख रुपये आर्थिक सहभाग देण्यास मान्यता.

(गृह विभाग)

प्रधानमंत्री आवास योजनेतील भाडेपट्टयाच्या दस्तांना १ हजार रुपये इतके कमी मुद्रांक शुल्क आकारणार. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गट लाभार्थ्याना होणार फायदा.

(महसूल विभाग)

गावोगावी इंटरनेटच्या सुविधा वाढविणार. राज्यातील २३८६ गावांमध्ये बीएसएनएलला मनोरे उभारण्यासाठी २०० चौ.मी. जागा मोफत देणार.

(महसूल विभाग )

अमरावती जिल्ह्यातील वासनी मध्यम प्रकल्पाच्या ८२६ कोटींच्या खर्चास सुधारित मान्यता. ४३१७ हेक्टर क्षेत्राला मिळणार लाभ

(जलसंपदा विभाग)

नंदुरबार जिल्ह्यातील कोरडीनाला प्रकल्पाच्या १६९.१४ कोटी खर्चास सुधारित मान्यता. ३६५९ हेक्टर जमिनीस सिंचनाचा लाभ

(जलसंपदा विभाग)

शासकीय कर्मचाऱ्यांना २००६ ते २००८ या वर्षातील अत्युत्कृष्ट कामासाठीचा आगाऊ वेतनवाढीचा लाभ देणार

(सामान्य प्रशासन विभाग )

महाराष्ट्र वन विकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना ७ व्या वेतन आयोगानुसार वेतनाची थकबाकी देण्याबाबत मंत्रिमंडळ उपसमिती.

(वन विभाग)

बीड जिल्ह्यातील आश्रमशाळेस अनुदानित तत्वावर मान्यता

(इतर मागास बहुजन कल्याण)

Share This News

Related Post

मोठी बातमी! उद्योगपती अविनाश भोसले यांना 8 जून पर्यंत सीबीआय कोठडी

Posted by - May 31, 2022 0
पुणे- प्रसिद्ध उद्योगपती अविनाश भोसले यांना आजही न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. त्यांना 8 जूनपर्यंत सीबीआय कोठडी देण्यात आली आहे. डीएचएफएल…

सणासुदीच्या दिवसात एसटी कर्मचाऱ्यांवर येणार आर्थिक संकट ? राज्य सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे एसटी महामंडळासमोर मोठे आव्हान

Posted by - September 19, 2022 0
महाराष्ट्र : पुढच्या महिन्यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांचा पगार कसा करायचा हा पेचाचा प्रश्न एसटी महामंडळासमोर उभा ठाकला आहे. सरकारकडून एसटी महामंडळास…
Chhatrapati Sambhaji Nagar

Chhatrapati Sambhaji Nagar : आईची भेट राहिली अधुरी ! आजारी आईला भेटण्याआधीच तरुणाने घेतला जगाचा निरोप

Posted by - September 9, 2023 0
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधून (Chhatrapati Sambhaji Nagar) एक मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये आई आजारी असल्यामुळे…

उद्योजक विक्रम किर्लोस्कर यांचे वयाच्या 64 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Posted by - November 30, 2022 0
बंगळुरू : प्रसिद्ध उद्योजक विक्रम किर्लोस्कर यांचे 29 नोव्हेंबर 2022 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे व याच्या 64 व्या…
Police beat

संभाजीनगरमध्ये वाहतूक पोलिसाची वाहनचालकाला भररस्त्यात लाथा बुक्क्यांनी मारहाण (Video)

Posted by - May 20, 2023 0
संभाजीनगर : संभाजीनगरमध्ये (Sambhajinagar) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये भर रस्त्यात एका वाहतूक पोलिसाची दादागिरी पाहायला मिळाली. देशांतर्गत…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *