ब्रजभूषण सिंह यांच्याविरोधात मनसेची पोलिसात तक्रार, काय आहे कारण ?

157 0

मुंबई- भाजप खासदार ब्रजभूषण सिंह यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात शड्डू ठोकले आहेत. राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला त्यांनी कडाडून विरोध केला आहे. आता ब्रजभूषण यांचे एक विधान मनसेच्या जिव्हारी लागले आहे. या प्रकरणी मनसेने दादर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

मनसेचे पदाधिकारी आणि मनसे जनहित कक्षाचे वकील ऍडव्होकेट गजणे, ऍडव्होकेट रवी पाष्टे, उपविभाग अध्यक्ष शशांक नागवेकर यांनी दादर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना ब्रजभूषण सिंह म्हणाले होते की, राज ठाकरेंचा बाप देखील अयोध्येत येऊ शकणार नाही.

‘बिहारचा बक्सर हा असा भाग आहे, जिथे भगवान राम यांनी शिक्षण ग्रहण केले. विश्वामित्रांनी लंका अभियानाची योजना इथूनच तयार केली. त्याच धरतीवरून आम्ही अयोध्या आंदोलनासाठी समर्थन मागायला आलेलो आहे’ असेही ब्रजभूषण म्हणाले होते.

माफी मागा मग अयोध्येत या !

राज ठाकरे यांनी अनेकदा आपल्या भाषणांमधून परप्रांतीयांचा मुद्दा लावून धरला. या मुद्द्यावरून त्यांनी उत्तर भारतीयांना सुनावले. त्यालाच उत्तर म्हणून ब्रजभूषण सिंह यांनी राज ठाकरे यांना अयोध्येत येण्यास मनाई केली. राज ठाकरे यांनी माफी मागावी अन्यथा त्यांना अयोध्येत पाय ठेऊ देणार नाही अशी भूमिका ब्रजभूषण सिंह यांनी घेतली. या विधानाचे पडसाद उमटताच राज ठाकरे यांनी आपला अयोध्या दौरा रद्द केला.

आज ब्रजभूषण यांनी राज ठाकरे यांना पुन्हा आव्हान दिल्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी तक्रार दाखल केली आहे.

Share This News

Related Post

9 नोव्हेंबर रोजी पुणे येथे मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा देशपातळीवरील शुभारंभ – मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

Posted by - November 7, 2022 0
पुणे : भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त अनुपचंद्र पांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत १ जानेवारी २०२३ या…

ॲड. गुणरत्न सदावर्तेंना बार कौन्सिलचा दणका; वकिली सनद दोन वर्षांसाठी रद्द

Posted by - March 28, 2023 0
  बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र, गोवानं ॲड. गुणरत्न सदावर्ते यांची वकिली सनद दोन वर्षांसाठी रद्द करण्यात आली बार कौन्सिलनं वकिलांना…

युजरने अभिषेक बच्चनला म्हटले बेरोजगार; बहिण श्वेता म्हणाली, ‘अभिषेकची तुलना अमिताभ बच्चन यांच्याशी केली जाणं पटत नाही’!

Posted by - October 24, 2022 0
मुंबई: अभिनेता अभिषेक बच्चन याला आजपर्यंत नेहमीच त्याच्या बॉलीवूड मधील कारकिर्दीमुळे ट्रोल करण्यात आले आहे. वडील अमिताभ बच्चन यांची आत्तापर्यंतची…

बाईक टॅक्सी विरोधात देशव्यापी लढा उभारणार! देशभरातील रिक्षा संघटनांची संयुक्त पत्रकार परिषद

Posted by - December 3, 2022 0
पुणे : आज देशभरातील रिक्षा संघटनांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन बाईक टॅक्सी विरोधात देशव्यापी लढा उभारणार असल्याची घोषणा केली आहे.…
Ajit Pawar And Supriya sule

Supriya Sule : बारामतीत अजित पवार उमेदवार देण्याच्या विधानावर सुप्रिया सुळेंनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Posted by - December 1, 2023 0
मुंबई : लोकसभेच्या निवडणुकीत पवार विरूद्ध पवार (Supriya Sule) हा जंगी सामना महाराष्ट्रात रंगणार आहे. कर्जतमध्ये पार पडलेल्या शिबिरात अजित…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *