Sanjay Raut

…. म्हणून काँग्रेस, आप पाठोपाठ शिवसेनेचाही नव्या संसदेच्या उदघाटनावर बहिष्कार

691 0

नव्या संसद भवनाचं उद्घाटन हे केवळ आपल्या नावाच्या पाट्या लागाव्यात म्हणून होत आहे. राजधानी दिल्लीत पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी अनेक इमारतींचं उद्घाटन केलं आहे. त्यावर त्यांचं नाव आहे. म्हणूनच नव्या संसद भवनाच्या पाटीवर आपलं नाव यावं म्हणून हा कार्यक्रम होत आहे. या उदघाटन कार्यक्रमासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू Draupadi Murmu याना का डावलण्यात आलं ? असा सवाल करत शिवसेना नेते संजय राऊत sanjay Raut यांनी या कार्यक्रमावर शिवसेना बहिष्कार घालत असल्याचे जाहीर केले आहे.

संजय राऊत म्हणाले, “सेंट्रल विस्टा central vista प्रकल्प कोरोना काळात सुद्धा देशाच्या तिजोरीवर लाखो कोटींचा भार देऊन बनवला. त्याची खरच गरज होती का? फक्त पंतप्रधानांची इच्छा आहे म्हणून अर्ध्या दिल्लीवर बुलडोझर फिरवून हा प्रकल्प उभा केला. सध्याच्या दिल्लीतील अनेक इमारतींवर उद्घाटक म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या नावाच्या पाट्या आहेत. फक्त त्या नावाच्या पाट्या उखडून नरेंद्र मोदींचं नाव यावं म्हणून हे काम केलं असेल तर देशाच्या इतिहासातून अशा प्रकारे नावे पुसली जाणार नाहीत.

आदिवासी महिलेला आम्ही देशाच्या राष्ट्रपती बनवल्याचं भाजप सांगत होता. मग या आदिवासी महिला राष्ट्रपतीला संसद भवनाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमातून का डावलण्यात आलं? राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा तो अधिकार आहे. त्या तिन्ही सैन्य दलांच्या प्रमुख आहेत, न्यायव्यवस्थेच्या प्रमुख आहेत. पंतप्रधान आणि राष्ट्रपती हे एकाच कार्यक्रमाला जाऊ शकतात. मात्र त्यांना या कार्यक्रमाला बोलवण्यात आलेलं नाही.

आत्ता जे संसद भवन आहे जिथे आम्ही बसतो ती इमारत आणखी १०० वर्षे टिकणार आहे. तरीही नवी संसद उभारली गेली. अशी टीका संजय राऊत यांनी केली.

Share This News

Related Post

बाजार समितीत महाविकास आघाडीचा गुलाल ! कुणाला किती जागा मिळाल्या ?

Posted by - April 29, 2023 0
राज्यातील 147 कृषी उत्पन्न बाजार समित्याच्या जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत आतापर्यंत 72 जागांचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये महाविकास आघाडीला…

Eknath Shinde : ‘मी बाप आणि नवरा म्हणून अपयशी’ मुख्यमंत्र्यांनी जाहीर सभेत दिली कबुली

Posted by - February 17, 2024 0
कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये शिवसेनेचं महाअधिवेशन भरवण्यात आलं आहे. या अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी जोरदार भाषण केलं. याच…

कोथरूडकरांचा पुणेरी दणका ! महापालिकेलाच पाठवलं 16 लाखांचं बिल !

Posted by - January 9, 2023 0
पुणे : बेकायदेशीर जाहिराती किंवा विनापरवाना भिंती रंगवल्या तर महापालिका कारवाई करते. महापालिकेने काही दिवसांपूर्वी आकाशचिन्ह धोरण जाहीर केलं आहे.…

#C-Vigil App : निवडणूक आयोगाच्या ‘सी-व्हिजिल’ ॲपवर आचारसंहिता भंगाच्या तक्रारी नोंदविण्याची सुविधा

Posted by - February 4, 2023 0
पुणे : निवडणूक प्रक्रियेमध्ये कोणताही आदर्श आचारसंहितेचे पालन व्हावे यासाठी भारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या ‘सी-व्हिजिल’ ॲपवर मतदार संघात होत…
Kolhapur News

Kolhapur News : कोल्हापूर हादरलं ! प्रेम करताना जात धर्म बघू नका असे स्टेटस ठेवत अल्पवयीन प्रेमी युगुलाची आत्महत्या

Posted by - September 2, 2023 0
कोल्हापूर : कोल्हापुरातील (Kolhapur News) शिरोलीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये (Kolhapur News) एका अल्पवयीन प्रेमी युगालाने सोशल…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *