बेकायदा होर्डिंग्जवर महापालिकेची कारवाई, अद्यापही 1300 अनधिकृत होर्डिंग्जचा वापर

613 0

पुणे : शहरातले चौक, रस्ते होर्डिंगने गजबजलेले आहेत तरीही वर्षानुवर्षे पुणे महापालिका त्यावर कारवाई करत नव्हती. आता शहराचे विद्रुपीकरण थांबण्यासाठी कारवाईचा बडगा उगारत महापालिकेने नऊ महिन्यात 642 होर्डिंग जमीनदोस्त केले आहेत. तरीही शहरात अद्याप 1 हजार 300 अनधिकृत होर्डिंग्जचा वापर सुरू आहे.

शहराला अनधिकृत होर्डिंग्ज, फ्लेक्स, जाहिरातींचा विळखा बसला आहे. पुणे महापालिकेने 2018 ते 2022 या चार वर्षात एकूण 1343 होर्डिंग्ज काढून टाकले पण तरीही अजून अनधिकृत होर्डिंग्जचा वापर सुरूच आहे.
राजकीय, जाहिरात आणि वेगवेगळ्या विषयांचे बॅनर जागोजागी दिसतात. बहुतांश बॅनर हे अनधिकृत असतात.

महापालिकेकडून बॅनर लावायला परवानगी दिली जाते पण अनेकदा परवानगी न घेताच ते लावले जातात. अशावेळी महापालिकेचा महसूलही बुडतो. म्हणून महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाकडून अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई करण्यात येते.

अनधिकृत जाहिरात फलकावर कारवाई केल्यानंतर 50 हजार रुपयांचा दंड जाहिरात फलकधारकांकडून वसूल करण्यात येतो.  पुणे महापालिकेने 2022 या वर्षात एप्रिल ते डिसेंबर या नऊ महिन्यात 642 होर्डिंग्जवर कारवाई केली.
त्यातील अवघ्या 25 होर्डिंगधारकांकडून दंड वसूल केला. अद्याप 2 कोटी 52 लाखांचा दंड वसूल करणं बाकी आहे.

शहरातील हे अनधिकृत होर्डिंग्ज वाहतुकीला अडथळा ठरतात. काही ठिकाणी सिग्नल यंत्रणा या होर्डिंग्जमुळे झाकली जाते. शहरात 2 हजार 311 अधिकृत होर्डिंग्ज आहेत तर बाकी अनधिकृत आहेत.

Share This News

Related Post

लाइक बटनावर क्लिक केले आणि माजी सैनिकाच्या खात्यातून १ कोटी लंपास झाले

Posted by - April 4, 2023 0
पुणे शहरात ऑनलाईन फसवणूक होण्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. क्षणिक मोहापायी सायबर चोरट्यांच्या जाळ्यात अडकून लोक लाखो रुपयांची फसवणूक…

मैत्री फाऊंडेशन व राजस सोसायटीच्या रक्तदान शिबिरात 52 जणांचे रक्तदान

Posted by - June 13, 2022 0
पुणे- शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मैत्री फाऊंडेशन, पुणे व राजस सोसायटी, कात्रज यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात…
Pune News

Pune News : दिवसभर अंगणात खेळला, रात्री अचानक 5 वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू

Posted by - August 11, 2023 0
पुणे : पुण्यामधून (Pune News) एक मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. पुण्यातील (Pune News) भोर तालुक्यात ही दुर्दैवी…

आव्हाडांच्या शुभेच्छांवर अण्णांचे सणसणीत उत्तर, काय म्हणाले अण्णा हजारे ?

Posted by - June 15, 2022 0
अहमदनगर – ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा आज वाढदिवस. या निमित्त राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी अण्णा हजारे यांना…

#ACCIDENT : लग्नाला जाणाऱ्या वऱ्हाडाच्या बोलेरो गाडीचा भीषण अपघात; नवरदेवासह पाच जणांचा दुर्दैवी अंत

Posted by - February 18, 2023 0
उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेश मधील हरदायी जिल्ह्यामध्ये शुक्रवारी भीषण अपघातामध्ये लग्नासाठी निघालेल्या नवरदेवासह कुटुंबातील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *