विधानपरिषदेसाठी भाजपकडून पाच उमेदवार जाहीर, पंकजा मुंडे यांना डावलले

341 0

मुंबई – विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपने आपले पाच उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना पुन्हा संधी देण्यात आली असून राम शिंदे, श्रीकांत भारतीय आणि उमा खापरे या नव्या तीन चेहऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र उमेदवारीच्या स्पर्धेत असलेल्या पंकजा मुंडे आणि सदाभाऊ खोत यांचा पत्ता कट झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

विधानपरिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा 9 जून हा शेवटचा दिवस आहे. महाराष्ट्रात विधानपरिषदेच्या १० जागांसाठी २० जून रोजी मतदान होणार आहे. या १० पैकी भाजपकडे चार जागांवर निवडून येण्यासाठी आवश्यक असणारी मते आहेत, तर शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे प्रत्येकी दोन आणि काँग्रेसकडे एका जागेवर निवडून येण्यासाठी लागणारी मते आहेत. त्यामुळे दहाव्या जागेवरील लढत चुरशीची होणार आहे.

परळी मतदारसंघातून २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या पंकजा मुंडे यांना भाजपकडून विधानपरिषदेसाठी संधी देण्यात येणार का, याची राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू होती. मात्र यावेळीही पंकजा यांना डावलण्यात आले. पंकजा मुंडे या विधानपरिषदेत जाण्यासाठी उत्सुक होत्या. त्यांनी गेल्या काही दिवसांमध्ये तसे संकेतही दिले होते. मला विधानपरिषदेत जाण्याची संधी मिळाल्यास, मी त्या संधीचं सोनं करेन, असेही पंकजा यांनी म्हटले होते.

देवेंद्र फडणवीस हे देखील पंकजा यांच्या विधानपरिषदेतील उमेदवारीसाठी सकारात्मक असल्याची चर्चा होती. मात्र, आता राज्यसभेपाठोपाठ पंकजा मुंडे यांची विधानपरिषदेत जाण्याची संधीही हुकली आहे. त्यामुळे पंकजा मुंडे काय भूमिका घेतात, हे पाहावे लागेल.

दरम्यान, कार्यकर्त्यांनी उमेदवारीसाठी इच्छा व्यक्त करायची असते मात्र निर्णय केंद्रीय पातळीवर घेण्यात येतो. पंकजा मुंडे आणि सदाभाऊ खोत यांच्याबाबत केंद्राने भविष्यात काही विचार केला असावा. पंकजा मुंडे यांना उमेदवारी मिळावी म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न केले. मात्र, केंद्राच्या निर्णयाचं पालन करायला हवं. असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले. राजकारणात पूर्णविराम नसतो स्वल्पविराम असतो. घटक पक्षांना सुद्धा भाजपमध्ये योग्य स्थान मिळालं आहे. असे देखील चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

Share This News

Related Post

Nanded Crime

Nanded Crime : नांदेडमध्ये ‘मुळशी पॅटर्न’ ! 22 जणांकडून तरुणाची तलवारीने सपासप वार करून निर्घृणपणे हत्या

Posted by - November 8, 2023 0
नांदेड : आपण मुळशी पॅटर्न चित्रपट पहिलाच असेल. या चित्रपटात दाखवण्यात आलेल्या घटनेचा प्रत्यय नांदेडमध्ये (Nanded Crime) पाहायला मिळाला. यामध्ये…

बनावट सोन्याचे दागिने ओळखण्याचे प्रशिक्षण ; महाराष्ट्र हा गोल्ड ऑर्नामेन्ट मॅन्युफक्चरिंग हब व्हावा : फत्तेचंद रांका

Posted by - September 24, 2022 0
पुणे : ‘सराफांनी नव्या डिझाईनचे दागिने घडवावेत, फक्त सोनसाखळी, अंगठी, गंठण यामध्ये अडकू नये. नव्या मशीन शिकाव्यात.एकत्र येऊन ‘गोल्ड ऑर्नामेन्ट…

नाशिकमध्ये विद्यार्थ्यांच्या बसला भीषण अपघात, ट्रकला धडकल्यानंतर बस उलटली

Posted by - February 4, 2022 0
नाशिक- मेडिकल कॉलेजच्या स्टाफला घेऊन जाणाऱ्या बसची ट्रकला जोरदार धडक बसून अपघात झाला. ट्रकला धडक दिल्यानंतर बस उलटली. या मध्ये…
Ratnagiri News

Ratnagiri News : रत्नागिरीमध्ये जिलेटीनचा मोठा साठा जप्त; एकाला अटक

Posted by - January 19, 2024 0
रत्नागिरी : रत्नागिरीमधून (Ratnagiri News) एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. रत्नागिरीतील मंडणगड शहरात ट्रॅक्टरमध्ये तब्बल 153 जिलेटिनच्या कांड्या आढळून…

मुंबईतील बसेसवर कर्नाटकची जाहिरात; रोहित पवार ट्विट करत म्हणाले…..

Posted by - December 14, 2022 0
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून राजकारण तापलेलं असताना आता मुंबईत बसवर कर्नाटक सरकारच्या जाहिराती पाहायला मिळत आहे. आमदार रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *