भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडून देहूतील कामाचा आढावा

266 0

पंतप्रधान  नरेंद्र मोदी १४ जून रोजी श्री क्षेत्र देहू येथे येणार असून, त्यांच्या हस्ते जगद्गुरु तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण होणार आहे. या कार्यक्रमाची जय्यत तयारी सध्या देहूत सुरू आहे. या कामाचा आढावा भाजपा प्रदेशाध्यक्ष  चंद्रकांत पाटील यांनी घेतला. 

तसेच,  पाटील यांनी यावेळी जगद्गुरु तुकाराम महाराज मंदिरात जाऊन, महाराजांचे दर्शन घेतले. तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना यावेळी आ. पाटील यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना दिल्या.

या कार्यक्रमास मोठ्या संख्येने वारकरी बांधव येणार असून, नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

यावेळी प्रदेश महामंत्री श्रीकांत भारतीय, महिला मोर्चाच्या अध्यक्षा उमा खापरे, ओबीसी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले, आमदार राहुल कुल, माजी मंत्री बाळाभाऊ भेगडे, हर्षवर्धन पाटील, पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे, आशा बुचके, यांच्या सह भाजपाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Share This News

Related Post

विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी आमूलाग्र बदलांची गरज- दीपक केसरकर

Posted by - September 16, 2022 0
पुणे: महाराष्ट्र शैक्षणिक क्षेत्रात देशात अग्रेसर राहण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्याच्या दृष्टीकोनातून शैक्षणिक क्षेत्रात आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे,…

पाककलेचा समृद्ध वारसा संक्रमित करण्याची गरज – शेफ विष्णू मनोहर

Posted by - February 27, 2022 0
भारतीय पाककलेचा समृद्ध वारसा पुढील पिढ्यांमध्ये संक्रमित करण्याची गरज असल्याचे मत सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी व्यक्त केले. पाककलेमध्ये निपुण…

पीएमपीएल चालकाच्या प्रसंगावधानामुळे २२ प्रवाशांचा वाचला जीव ; शिंदवणे घाटातील घटना

Posted by - May 20, 2022 0
पुणे- शिंदवणे घाटातून उरळीकांचनच्या दिशेने निघालेल्या पीएमपीएल बसचा ब्रेक अचानक फेल झाला. मात्र चालकाच्या प्रसंगावधानामुळे बसमधील २२ प्रवाशांचा जीव वाचला.…
manoj-jarange-patil

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षण आंदोलनाला किती कोटी खर्च झाला? मनोज जरांगेनी भरसभेत हिशोबच मांडला

Posted by - October 14, 2023 0
जालना : अंतरवाली सराटी इथं मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या सभेला मराठा समाजाने विराट गर्दी केलीय. सभेच्या सुरुवातीला…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *