“भाजप,मनसे हे आमचे जुने सहकारी,त्यांनी साधी विचारपूसही केली नाही…!” वाचा संजय राऊत यांनी ‘का’ केले असे ट्विट

263 0

मुंबई : सुमारे तीन महिने तुरुंगात राहिल्यानंतर संजय राऊत यांना जामीन मंजूर झाला. त्यानंतर अनेकांनी त्यांची स्वतः भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. तर अनेकांनी फोन करून त्यांची खुशाली विचारली त्यामध्ये नेमकं जुन्या सहकाऱ्यांनी साधी विचारपूस देखील केली नाही. असा खेद संजय राऊत यांनी व्यक्त केला. 

तर झाले असे की, भारत जोडो यात्रेवर असताना राहुल गांधी यांनी स्वतः संजय राऊत यांना फोनवरून तब्येतीची विचारपूस केली. याबद्दल संजय राऊत यांनी ट्विट करून आभार देखील त्यांचे व्यक्त केले. यावेळी ते म्हणाले आहेत की,  “सध्या राजकारणात किती कडवटपणा आला आहे हे आपल्याला माहित आहे. राहुल गांधींचा फोन म्हणजे अशा कडवटपणात एक प्रेमाची झुळूक म्हणता येईल. 102 दिवसानंतर मी तुरुंगातून बाहेर आल्यावर किती लोकांनी माझी चौकशी केली याची मला माहिती आहे. माझा पक्ष ठाकरे, कुटुंबीयांनी त्याचबरोबर पवार कुटुंबीयांनी देखील माझी चौकशी केली मात्र भाजप, मनसे हे माझे जुने सहकारी त्यांनी साधी विचारपूसही केली नाही. अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.

त्याचबरोबर त्यांनी भाजपवर टीका देखील केली आहे. ती म्हणजे राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत वक्तव्य केल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने घेतलेली विरोधी भूमिका आणि राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करून देखील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी शांत राहण्याची घेतलेली भूमिका अर्थात ते म्हणाले आहेत की, “भाजप आणि आमच्यात हाच फरक आहे. आम्ही राहुल गांधींनी सावरकरांबाबत जे वक्तव्य केलं त्याबाबत थेट भूमिका घेतली. पण राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करून देखील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजूनही शांतच आहेत अशी टीका त्यांनी केली आहे.”

Share This News

Related Post

बडे अधिकारी असल्याचे भासवून तब्बल 250 तरुणींना फसवणाऱ्या दोन भामट्याना अटक (व्हिडिओ)

Posted by - January 26, 2022 0
पिंपरी- केंद्र सरकारमध्ये बडे अधिकारी असल्याची खोटी ओळख सांगून तब्बल अडीचशे पेक्षा जास्त तरुणींना फसविणाऱ्या आणि त्यांचे शारीरिक शोषण करणाऱ्या…

2024 च्या निवडणुकीवर काँग्रेसचे ‘G23’ गटाचे असंतुष्ट नेते काय म्हणाले ?

Posted by - March 17, 2022 0
नवी दिल्ली- काँग्रेसच्या ‘G23’ गटातील नेत्यांना त्यांच्याच पक्षाच्या म्हणजेच काँग्रेसकडून विरोध होत आहे. मल्लिकार्जुन खर्गे यांनी या नेत्यांवर पक्ष फोडल्याचा…

अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल करणाऱ्या अनिल जयसिंघानियाला गुजरात मधून अटक; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता

Posted by - March 20, 2023 0
मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल करणाऱ्या बुकी अनिल जय सिंघानियाला पोलिसांनी अखेर गजाआड केलं…

भारतातील पहिला व्हर्च्युअल रियालिटी (VR) चित्रपट : स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या वरील चित्रपटाची घोषणा

Posted by - February 24, 2023 0
पुणे : मुक चित्रपटापासून सुरू झालेला सिनेमाचा प्रवास कृष्णधवल, रंगीत ७० mm असा करत थ्री डी आणि ८ डी पर्यन्त…

कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक : भाजप उमेदवाराचे नाव थोड्या दिवसात दिल्ली मधून जाहीर होणार – चंद्रकांत पाटील

Posted by - January 23, 2023 0
पुणे : दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर उमेदवारीसाठी अनेक साठणिक नेते इच्छुक आहेत. दरम्यान…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *