#PUNE : कसबा विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीतील भाजप उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचाराचा शुभारंभ

1070 0

पुणे : कसबा विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीतील भाजप, शिवसेना (बाळासाहेब ठाकरे), रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट), राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम, रयत क्रांती संघटना आणि पतित पावन संघटना महायुतीचे अधिकृत उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ओमकारेश्‍वर मंदिर परिसरात झाला. त्यानंतर शनिवार पेठ, नारायण पेठ, सदाशिव पेठ या परिसरात पदयात्रा काढण्यात आली.

निवडणूक प्रमुख आमदार माधुरी मिसाळ, शहर भाजप अध्यक्ष जगदीश मुळीक, शिवसेना (बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहर प्रमुख प्रमोद भानगिरे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) शहर अध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, राष्ट्रीय समाज पक्षाचे शहर अध्यक्ष भरत लगड, पतित पावन संघटनेचे अध्यक्ष स्वप्नील नाईक, आमदार भीमराव तापकीर, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, चिटणीस धीरज घाटे, संघटन सरचिटणीस राजेश पांडे, माजी आमदार बापूसाहेब पठारे, योगेश टिळेकर, माजी सभागृह नेते गणेश बिडकर, श्रीनाथ भिमाले, प्रदेश प्रवक्ता कुणाल टिळक, गौरव बापट, शहर भाजप सरचिटणीस गणेश घोष, राजेश येनपुरे, दीपक पोटे, माजी नगरसेवक गायत्री खडके, अजय खेडेकर, योगेश समेळ, आरती कोंढरे, कसबा भाजपचे अध्यक्ष प्रमोद कोंढरे, सरचिटणीस छगन बुलाखे, राणी सोनावणे, राजेंद्र काकडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

सुरेश मुनगंटीवार यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
१९७८ सालापासून एखाद-दुसरा अपवाद वगळला तर कसबा मतदारसंघातील मतदारांनी भाजपला पहिली पसंती दिली आहे.
सत्य, धर्म, देश, विकासासाठी काम करणार्‍या विचारांचा विजय झाला आहे.
विरोधी उमेदवाराने वारंवार पक्ष बदलला आहे, त्याची लढाई खुर्चीसाठी, सत्तेसाठी आहे.
हेमंत रासने यांचा लढा सत्य आणि विकासासाठी आहे.
केंद्र आणि राज्यात भाजप आणि बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे सरकार आहे.
कसब्यातील मतदारांना आवाहन आहे जनतेच्या सेवेच्या संकल्पनेतून काम करणार्‍या भाजपला विजयी करा.
हेमंत रासने कसब्याचे आणि पुण्याचे प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रयत्न करतील याची ग्वाही मी देतो.
कसब्यातील मतदारांना सुवर्णसंधी आहे, भाजपची विजयाची परंपरा पुढे न्यावी.
२०२४ च्या विधानसभा लढाईचा हा शुभारंभ असेल असा विश्‍वास वाटतो.

हेमंत रासने यांच्या भाषणातील मुद्दे
आजपासून आमचे ज्येष्ठ नेते सुधीरभाऊ मुनगंटीवार, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रचाराचा शुभारंभ आम्ही करत आहोत.
हा शुभारंभ विक्रमी विजयाकडे घेऊन जाणारा आहे.
कसबा विधानसभा निवडणुकीत विजय १०० टक्के निश्‍चित
आम्हाला कधीच कोणाची भीती वाटत नाही.
जास्तीत जास्त लोकांपर्यंत आम्ही पोहोचणार आहोत.
भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे हजारो कार्यकर्ते त्याबरोबर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या ताकदीवर आम्ही घर आणि घर पिंजून काढणार आहोत.
आम्ही केलेल्या विकासाचा अजेंडा आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आम्ही देशात, राज्यात आणि शहरात विकास करीत आहोत
पुढील ५० वर्षांतील पुणे शहर हे देशातील सर्वोत्तम शहर करण्याचे देवेंद्रजींचे स्वप्न आहे.
या स्वप्नाला पुणेकरांची साथ आहे आणि आम्ही ते पूर्ण करू हा मला विश्‍वास आहे.

Share This News

Related Post

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते वानवडी येथील “वानवडी जनरल हॉस्पिटल”चे लोकार्पण

Posted by - March 13, 2022 0
उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आज पुणे शहराच्या दौऱ्यावर असून तब्बल 31 विकासकामांचं लोकार्पण तसेच भूमिपूजन अजित पवार…

#GOUTAMI PATIL : साताऱ्यात गौतमी पाटील विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश ; पुन्हा काय घडलं ? वाचा सविस्तर

Posted by - January 24, 2023 0
सातारा : काही दिवसांपासून गौतमी पाटील हि नृत्यांगणा चांगलीच चर्चेत आली आहे. तिच्या सौंदर्याने आणि अदानी तिने तरुणांना घायाळ तर…

#CHANDRAKANT PATIL : दिव्यांग मूल असलेल्या शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ७३० दिवसांच्या बालसंगोपन रजेची तरतूद

Posted by - March 10, 2023 0
मुंबई : दिव्यांग मूल असलेल्या शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांचे मूल २२ वर्षांचे होईपर्यंतच्या कालावधीमध्ये एकूण ७३० दिवसांच्या बालसंगोपन रजेची…

बोधकथा : स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त विशेष; ‘हि’ बोध कथा तुमचे आयुष्य बदलेल !

Posted by - January 12, 2023 0
बोधकथा : स्वामी विवेकानंद (१२ जानेवारी, १८६३ – ४ जुलै, १९०२, नरेंद्रनाथ दत्त) हे एक भारतीय संन्यासी आणि तत्त्वज्ञ होते.…

पुणे महापालिकेतील स्थायीच्या अध्यक्षपदाची निवडणूक ६ मार्चला

Posted by - February 18, 2022 0
पुणे- पुणे महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची निवडणूक ६ मार्च रोजी घेण्यात येणार आहे. पुणे महापालिकेची मुदत १४ मार्च रोजी संपत…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *