#PUNE : कसबा पोट निवडणुकीचे भाजप उमेदवार हेमंत रासनेंवर गुन्हा दाखल; हेमंत रासनेनकडून आचार संहितेचा भंग ?

1267 0

पुणे : काल २६ फेब्रुवारी रोजी कसबा विधानसभा पोटनिवडणूक पार पडली. या पोट निवडणुकीमध्ये भाजपचे अधिकृत उमेदवार हेमंत रासने यांनी मतदान केले. परंतु मतदान करते वेळी त्यांनी त्यांच्या गळ्यामध्ये भाजपचे अधिकृत चिन्ह कमळ चिन्ह असलेले उपरणे गळ्यात घातले होते. यावरूनच आता आक्षेप घेतला जात असून निवडणूक आयोगानं याची गंभीर दखल घेतली आहे.

दरम्यान भाजप उमेदवार हेमंत रासने यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रासने यांच्यावर मतदान केंद्रात भाजपचे उपरणे घालून मतदान केल्याप्रकरणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केलाय.

प्रचार संपल्यानंतर पक्ष चिन्ह असलेले उपरणे गळ्यात घालून प्रचार केल्याचे निदर्शनास आल्याचा ठपका ठेवून निवडणुकीत आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी हेमंत रासने यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share This News

Related Post

श्री शंकर महाराज समाधी ट्रस्टच्या ११ व्या रक्तदान शिबिरात ३७९ बॅग रक्त संकलित

Posted by - April 12, 2022 0
पुणे- श्री शंकर महाराज समाधी ट्रस्ट व रक्ताचे नाते ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अकराव्या रक्तदान शिबिरात ३७९ बॅग रक्त…
Cocain Seizes

थर्मोकोलच्या बॉल्समध्ये लपवून ठेवलेले 1922 ग्रॅम कोकेन जप्त; दिल्ली पोलिसांची कारवाई

Posted by - June 16, 2023 0
नवी दिल्ली : थर्मोकोलच्या बॉल्समध्ये लपवून ठेवलेले कोकेन डीआरआयच्या दिल्ली झोनल युनिटने जप्त केले आहे. या कारवाईत एकूण 1922 ग्रॅम…
Pan Card Money

PAN Card संबंधित ‘ही’ एक चूक तुम्हाला पडू शकते 10 हजार रुपयांना; जाणून घ्या त्याबद्दल

Posted by - June 22, 2023 0
पॅन किंवा परमानेंट अकाउंट नंबर हा 10 अंकी अल्फान्यूमेरिक आयडी (PAN Card) आहे. जो भारतीयांसाठी एक महत्त्वाचे कायदेशीर ओळखपत्र आहे.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *