धनगर आरक्षणाबाबत भाजप आणि शिंदे गटाची भूमिका दुटप्पी, केंद्राने स्पष्ट करावे लोकसभेत खासदार सुळे यांचा कडाडून हल्ला

213 0

दिल्ली : महाराष्ट्र सरकार कष्टकरी धनगर समाजाला बदनाम करत आहे, असा आरोप करत खासदार सुप्रिया सुळे यांनी आज लोकसभेत भाजप आणि शिंदे गटाच्या दुटप्पी भूमिकेवर कडाडून हल्ला चढवला. शिंदे गटाचे खासदार गावित हे धनगर आरक्षणाला विरोध करत आहेत, ही बाब लक्षात आणून देत भाजप आणि केंद्र सरकारने याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

लोकसभेत द कॉन्स्टिट्यूशन (शेड्युल ट्राईब) ऑर्डर पाचवी घटनादुरुस्ती विधेयक २०२२ बाबत झालेल्या चर्चेत सहभागी होत त्यांनी धनगर आरक्षणाबाबत भाजप आणि शिंदे गटाच्या महाराष्ट्रातील आणि दिल्लीतील वेगवेगळ्या भूमिकांवर नेमके बोट ठेवले. कालपर्यंत यांची भूमिका धनगर समाजाला आरक्षण मिळायला हवे अशी होती. आज मात्र ते विरोध करत आहेत’. त्यामुळे सरकारने भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी करत मंत्र्यांकडे खुलासा मागितला तसेच धनुकर आणि धनुवर, समाज कोंड आणि कोंडा समाज सोरारा आणि सोंद्रा समाज आहेत. तसेच धनगर आणि धनगड एक आहेत त्यामुळे सरकारने एक विधेयक आणि धनगर समाजाला न्याय द्यावा अशी विनंती केली.

एकीकडे भाजपा आरक्षण देऊ असे सांगत असताना शिंदे गटाचे खासदार गावीत म्हणत आहेत, की धनगर आरक्षणाला आमचा विरोध आहे. त्यामुळे आपली भाजपाला विनंती आहे, की तुम्ही शिंदे गटाबरोबर सत्तेत आहात तर तुमची नेमकी काय भूमिका ते स्पष्ट करा. ज्या धनगर समाजाला तुम्ही आरक्षण देऊ, असे आश्वासन दिले त्याच समाजाचा आज तुम्ही विश्वासघात करत आहात. त्यामुळे भाजपाने याविषयी आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी केली

देवेंद्र फडणवीस राज्याचे विरोधी पक्षनेता होते तेंव्हा २०१३ साली बारामती लोकसभा मतदासंघात येऊन म्हणाले होते, की आमचे सरकार आल्यानंतर धनगरांना पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देऊ; पण पाच वर्षात अडीचशे कॅबिनेट होऊनही ते आरक्षण देऊ शकले नाहीत याची पुन्हा एकदा त्यांनी सभागृहाला आठवण करून दिली. महाविकास आघाडीची पहिल्यापासून ही मागणी आहे की कुणाचेही आरक्षण न काढता धनगर, मराठा, लिंगायत व मुस्लिम समाजाला हक्काचे आरक्षण द्या, असेही त्या म्हणाल्या.

सरकारने प्रत्येक राज्यासाठी वेगवेगळे विधेयक आणण्यापेक्षा संपुर्ण देशासाठी एक विधेयक आणावे आणि महाराष्ट्रातील धनगर, मराठा, लिंगायत, मुस्लीम समजालाही आरक्षण द्यावे अशी मागणीही सुळे यांनी केली. सरकारने २०१४ साली स्थापन केलेल्या हृषीकेश पांडा समितीने देखील सरकारला देशासाठी एक सामायिक विधेयक आणण्याचा प्रस्ताव दिला होता याची आठवणही त्यांनी यावेळी करून दिली.

Share This News

Related Post

Milk

Milk : दुध दर प्रश्नी हस्तक्षेप करा,अन्यथा आंदोलन करू; किसान सभेचा दुग्धविकास विभागाला इशारा

Posted by - November 18, 2023 0
राज्यात दुध संघ व कंपन्यांनी संगनमत करून दुधाचे (Milk) भाव पाडल्याने दुध उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. दुधाच्या चढ उतारामुळे…

नितीश कुमार ज्या मार्गावर चालले आहेत, त्याला राजकारणातला उध्दव मार्ग म्हणतात….

Posted by - August 10, 2022 0
मुंबई: बिहार मध्ये मोठा राजकीय भूकंप झाला असून नितीशकुमार यांची भाजपा सोबत फारकत घेत राजद बरोबर संसार थाटला असून नितीशकुमार…

मोठी बातमी : प्रजासत्ताक दिनी शिवाजी पार्क हवाई हल्ला ? मुंबई पोलीस सतर्क…

Posted by - January 25, 2023 0
मुंबई : दरवर्षीप्रमाणे याही वर्षी २६ जानेवारी रोजी शिवाजी पार्कवर परेड होणार आहे. 26 जानेवारीची ही विशेष परेड मुंबईकरांसाठी आकर्षणाचा…
Govardhan Sharma

Govardhan Sharma : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि आमदार गोवर्धन शर्मा यांचं निधन

Posted by - November 4, 2023 0
अकोला : भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते आणि अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोवर्धन शर्मा (Govardhan Sharma) यांचे काल रात्री…
Jayant Patil

Ajit Pawar : अजित पवार गटाकडून जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदावरुन हकालपट्टी

Posted by - July 3, 2023 0
मुंबई : अजित पवारांनी (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेससोबत बंडखोरी करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.त्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. त्यानंतर…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *