मोठी बातमी : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पुन्हा जिवे मारण्याची धमकी

445 0

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पुन्हा जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. आज नितीन गडकरी यांच्या संपर्क कार्यालयात दोन फोन कॉल्स आले. या फोन कॉल्स मधून त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी नितीन गडकरी यांच्या नागपूरमधील कार्यालयात पुन्हा एकदा धमकीचा फोन आला. दोन वेळा हा फोन करण्यात आला होता. फोन करणाऱ्या व्यक्तीने जयेश पुजारीच्या नावाने फोन केला होता. फोनवर या व्यक्तीने 10 कोटींची खंडणी मागितली. एकापाठोपाठ दुसऱ्यांदा फोन आल्यामुळे नितीन गडकरी यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी याची माहिती तातडीने पोलिसांना दिली.

याआधी देखील गडकरींच्या कार्यालयात धमकीचे फोन आले होते. जयेश पुजारी या नावानेच हे फोन आले होते. या प्रकरणी पोलिसांनी बंगळुरला जाऊन चौकशी केली होती. पण त्याने हे फोन कॉल केले नाही अशीच माहिती दिली होती. आता या प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकारी गडकरींच्या कार्यालयात चौकशी करत आहे.

दोन महिन्यांपूर्वी 14 जानेवारीला नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. नागपूर येथील कार्यालयात नितीन गडकरी यांना 3 वेळा फोन करून धमकी देण्यात आली होती. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नावाने ही धमकी देण्यात आली होती आणि 2 कोटी खंडणी मागितली होती. पण हा फोन दुबई नाही तर बेळगाव तुरुंगातून आला होता.

हा कॉल एका सराईत गँगस्टरने केला होता. तो सध्या बेळगाव तुरुंगात आहे. तुरुंगाच्या आत त्याच्याकडे नियमबाह्य पद्धतीने असलेल्या फोनच्या माध्यमातून त्याने हे कॉल केल्याचे समोर आले होते. गडकरी यांच्या कार्यालयात फोन कॉलच्या माध्यमातून धमकी देणाऱ्या गुन्हेगाराचे नाव जयेश पुजारी असल्याचे समोर आले होते. या प्रकरणी पोलिसांनी बेळगावला जाऊन चौकशी केली होती.

या फोन नंतर गडकरी यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी माहिती पोलिसांना कळवली आहे. वरिष्ठ अधिकारी अधिक तपास करत आहेत.

Share This News

Related Post

Ahmadnagar Murder

वाद करू नका म्हणणाऱ्या मेव्हणीचाच ‘कार्यक्रम’

Posted by - May 23, 2023 0
अहमदनगर : अहमदनगरमध्ये (Ahmadnagar) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये भांडण सोडवायला गेलेल्या महिलेची तिच्या मेव्हण्यानेच हत्या (Murder) केली…

समृध्दी महामार्गावर पुन्हा भीषण अपघात; 14 जणांचा मृत्यू

Posted by - August 1, 2023 0
समृद्धी महामार्गावर अपघात झाला असून १४ कामगारांचा यात मृत्यू झाला आहे. शहापूर तालुक्यातील सरलांबे येथे पुलाचे काम सुरू असताना पुलावरील…
Ahmednagar News

Ahmednagar News : शिवसेना शिंदे गटाच्या ‘या’ नगरसेवकाला जीवे मारण्याचा प्रयत्न

Posted by - February 15, 2024 0
अहमदनगर : एका महिन्यात चार गोळीबाराच्या घटना (Ahmednagar News) घडल्याने महाराष्ट्र हादरला होता. अशीच एक गोळीबाराची घटना अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरमध्ये…

सणासुदीच्या दिवसात एसटी कर्मचाऱ्यांवर येणार आर्थिक संकट ? राज्य सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे एसटी महामंडळासमोर मोठे आव्हान

Posted by - September 19, 2022 0
महाराष्ट्र : पुढच्या महिन्यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांचा पगार कसा करायचा हा पेचाचा प्रश्न एसटी महामंडळासमोर उभा ठाकला आहे. सरकारकडून एसटी महामंडळास…

भाजपा 27% ओबीसी उमेदवारांना संधी देणार; विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा (व्हिडिओ)

Posted by - May 7, 2022 0
मुंबई- राज्यातील ओबीसीचं राजकीय आरक्षण महाविकास आघाडी सरकारच्या हलगर्जीपणामुळे गेलं असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपा 27% ओबीसी उमेदवारांना…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *