मोठी बातमी ! संजय राऊतांची संपत्ती ईडीकडून जप्त

406 0

मुंबई- शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना ईडीने मोठा दणका दिला आहे. ईडीने राऊत यांच्यावर कारवाई करत त्यांचे अलिबागमधील ८ भूखंड, दादरमधील १ फ्लॅट जप्त केला आहे. संजय राऊतांनी मनी लाँड्रिंगमधील पैशातून संपत्ती खरेदी केली असल्याची माहिती ईडीकडून देण्यात आली आहे. तसेच, संजय राऊत आणि त्यांच्या जवळील नेत्यांवरही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

संजय राऊत यांची अलिबाग आणि दादरमधील संपत्ती जप्त केली आहे. जप्त केलेल्या संपत्तीमध्ये अलिबागमधील आठ भूखंड आणि दादरच्या फ्लॅटचा समावेश असल्याची माहिती भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर चर्चेत आलेला पत्राचाळ घोटाळा1034 कोटींचा असल्याचे समजते. याप्रकरणी संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना ईडीने यापूर्वीच अटक केली आहे. या प्रकरणी गेल्या आठवड्यात आरोपपत्रही दाखल करण्यात आले आहे. राऊतांच्या मुलींच्या कंपनीत भागीदार असलेल्या सुजित पाटकर यांच्या घरावरही यापूर्वी ईडीने छापेमारी केली होती. शिवाय संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना पंजाब महाराष्ट्र सहकारी बँक खात्यातून केलेल्या 55 लाखांच्या व्यवहाराप्रकरणी ईडीने नोटीस पाठवली होती. या प्रकरणी त्यांची चौकशीही झाली. संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधवी राऊत आणि वर्षा राऊत यांच्यात झालेले आर्थिक व्यवहार ईडीच्या रडारवर आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांनी कारवायांचा सपाटा लावला आहे. महाविकास आघाडीचे अनेक नेते ईडीच्या रडारवर आहेत. त्यावरुन वारंवार विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळालं होतं. केंद्रात सत्ता असलेलं भाजप केंद्रीय यंत्रणांचा वापर करुन बिगर भाजपशासित राज्यांमधील इतर पक्षांच्या नेत्यांना त्रास देत असल्याचा आरोप महाराष्ट्रातील नेत्यांकडून केला जात होता.

संजय राऊत यांनी यापूर्वी थेट ईडीवर आरोप केले होते. ईडीचे मोठे अधिकारी भाजपचे तिकीट घेऊन निवडणूक लढवत आहेत. ज्या ईडी अधिकाऱ्याने निवडणूक लढवली त्याने पन्नास जणांचा खर्चही केलाय. ईडी भाजपची एटीएम मशीन बनली आहे. मी अतिशय जबाबदारीने हे वक्तव्य करतोय. एक्स्टॉर्शनच्या बाबतीतला सगळा कच्चाचिठ्ठा पंतप्रधान कार्यालयाला दिला आहे. असे राऊत म्हणाले होते. या सर्व आरोप राऊतांना भोवले असल्याचे बोलले जात आहे.

Share This News

Related Post

स्वातंत्र्यवीर सावरकर आमचं दैवत, आपमान सहन करणार नाही

Posted by - March 26, 2023 0
मालेगाव: स्वातंत्र्यवीर सावरकर हे आमचं दैवत असून आम्ही स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान कदापि सहन करणार नाही अशा शब्दात शिवसेना उद्धव बाळासाहेब…
Mantralaya

Contract Recruitment : आरोग्य खात्यातील कंत्राटी भरतीचा निर्णय राज्य सरकारने घेतला मागे

Posted by - December 19, 2023 0
नागपूर : राज्यात सरकारी नोकऱ्यांमध्ये सुरू असलेल्या कंत्राटीकरणावर (Contract Recruitment) तरुणांमध्ये चांगलीच नाराजी पसरली आहे. तरुणांचा रोष टाळण्यासाठी आता आरोग्य…

Maharashtra politics : ‘मित्र’ च्या उपाध्यक्षपदी अजय अशर यांच्या नियुक्तीने नवीन वाद; विरोधकांनी उठवली टिकेची झोड, वाचा सविस्तर प्रकरण

Posted by - December 3, 2022 0
Maharashtra politics : सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक विषयावरून वादंग निर्माण होत आहेत. या ना त्या कारण सातत्याने राजकीय वर्तुळात टीकाटिप्पणी…

केस गळतीने हैराण झाले आहात ? या घरगुती उपायांनी केवळ आठ दिवसात थांबू शकते केस गळती

Posted by - October 11, 2022 0
केस गळणे हा आजार नसून केवळ एक समस्या आहे. केस गळतीची अनेक कारणे असतात. यामध्ये प्रामुख्याने प्रदूषण, ताणतणाव, कोंडा किंवा…
Datta Dalvi

Datta Dalvi : ठाकरे गटाचे नेते दत्ता दळवींना जामीन मंजूर

Posted by - December 1, 2023 0
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी (Datta Dalvi) यांना आज कोर्टाकडून जामीन…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *