मोठी बातमी : MPSC विद्यार्थ्यांची मागणी मान्य, नवीन अभ्यासक्रम 2025 पासून लागू होणार !

496 0

पुणे : MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची मागणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून मान्य करण्यात आली आहे. नवीन अभ्यासक्रम 2025 पासून लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य लोकसेवा आयोगाने हा निर्णय जाहीर केल्यानंतर विद्यार्थ्यांकडून पुण्यातील झाशीची राणी चौकात जल्लोष साजरा करण्यात आला.

मागील काही दिवसांपासून विद्यार्थ्यांकडून आंदोलन सुरू होते. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने याबाबतचा निर्णय ट्वीट करून जाहीर केला. राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या वर्णनात्मक स्वरूपाच्या परीक्षेसंदर्भातील उमेदवारांची मागणी, कायदा व सुव्यवस्थेची निर्माण झालेली परिस्थिती व उमेदवारांना तयारीसाठी द्यावयाचा अतिरिक्त कालावधी विचारात घेऊन सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम सन 2025 पासून लागू करण्यात येत असल्याचे आयोगाने म्हटले.

मागील अनेक वर्षांपासून पुण्यात किंवा राज्यभर विद्यार्थी राज्यसेवा परीक्षेचा अभ्यास करत आहेत. दोन वर्ष कोरोना असल्याने या विद्यार्थ्यांना काही प्रमाणात त्रास सहन करावा लागला होता. त्यानंतर परीक्षांच्या तारखा देखील लवकर जाहीर झाल्या नाहीत. या सगळ्यांमुळे विद्यार्थी संतापले होते. त्यानंतर नवा पॅटर्न लागू करणार असल्याने विद्यार्थी आक्रमक झाले होते.

Share This News

Related Post

मोठी बातमी! शिवसेना नेते संजय राऊत यांना तीन दिवसांची ईडी कोठडी

Posted by - August 1, 2022 0
मुंबई: गोरेगाव येथील पत्राचाळ जामीन घोटाळा प्रकरणी ईडीच्या अटकेत असलेले शिवसेना नेते संजय राऊत यांच्या संदर्भातील एक मोठी बातमी समोर…

मल्लिकार्जुन खर्गे यांनी स्वीकारला काँग्रेस अध्यक्षपदाचा पदभार

Posted by - October 26, 2022 0
काँग्रेसला तब्बल २४ वर्षांनी बिगर गांधी कुटुंबातील अध्यक्ष मिळाला आहे.काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जून खर्गे यांना काँग्रेसच्या अध्यक्षपदाची आज बुधवारी (ता.…
Pune Suicide News

Pune Suicide News : धक्कादायक ! पुण्यातील होळकर पुलाजवळ तरुणाची आत्महत्या

Posted by - October 27, 2023 0
पुणे : पुण्यातून (Pune Suicide News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये खडकी परिसरातील होळकर पुलाजवळ एका तरुणाने गळफास…
Ajit Pawar Sad

उठा उठा अजित पवार नॉट रिचेबल जाण्याची वेळ झाली; शरद पवारांच्या निर्णयानंतर अजित पवार ट्रोल

Posted by - June 10, 2023 0
पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी “आता भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे” असे विधान केले…

पुणे:शुक्रवार पेठेतील जीर्ण झालेल्या वाड्याची पडधड;६ रहिवाशांची सुखरुप सुटका

Posted by - July 9, 2022 0
पुणे : अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेच्या वतीने शहरातील 478 जुन्या वाड्यांना नोटीस बजावली आहे.शहरातील मध्यवर्ती भागांमध्ये अनेक जुनाट वाडे आहेत.पावसाळ्यामध्ये…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *