BIG NEWS : अखेर खासदार संजय राऊत यांना जामीन मंजूर

388 0

मुंबई : उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांना अखेर जामीन मंजूर झाला आहे. त्यामुळे आता लवकरच त्यांची तुरुंगातून सुटका होणार असून 100 दिवसानंतर त्यांची सुटका होते आहे.

आज शंभर दिवसानंतर अखेर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना पीएमएलए न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाला नक्कीच मोठा दिलासा मानला जात आहे. संजय राऊत हे पत्राचा घोटाळा प्रकरणात तुरुंगात होते.

शिवसेना नेते संजय राऊत यांना पत्राचा घोटाळा प्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने 31 जुलै रोजी अटक केली. आत्तापर्यंत संजय राऊत यांनी जामीनासाठी कोर्टात अनेक वेळा अर्ज केले होते. परंतु त्यांना जामीन मंजूर झाला नाही. आज त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. अखेर कोर्टाने आज त्यांना जामीन मंजूर केल्यामुळे त्यांची सुटका होणार आहे.

आज जामीन अर्जावर सुनावणी होत असताना संजय राऊत यांना जामीन मिळावा यासाठी अनिल देशमुख प्रकरणाचा दाखला देण्यात आला. अनिल देशमुख यांना ज्या पद्धतीने जामीन देण्यात आला आहे. तसाच राऊत यांनाही जामीन देण्याची मागणी करण्यात आली कोर्टाने जामीन मंजूर करून त्यांना दोन लाखाच्या जात मुचलक्यावर सोडण्याचे निर्देश दिले आहेत.

तथापि अद्याप देखील संजय राऊत यांच्यावरील संकट कमी झालेले नाही. इडीकडून राऊत यांच्या जामिनाला विरोध करण्यात येणार असून, जामीन रद्द व्हावा यासाठी उच्च न्यायालयात जाणार असल्याचे देखील समजते आहे. दरम्यान जामीन मंजूर झाल्यानंतर शिवसेनेमधून जल्लोष साजरा करण्यात येतो आहे.

Share This News

Related Post

लज्जास्पद! सरकारनं पेट्रोल डिझेल दर कपातीचा निर्णय घेतलाच नाही; विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी साधला राज्य सरकार वर निशाणा

Posted by - May 23, 2022 0
पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्कात अनुक्रमे 7 आणि 6 रुपये प्रतिलीटर कपात केली. केंद्राच्या घोषणेनंतर राज्य सरकारनेही काल व्हॅटमध्ये कपात करण्याची घोषणा…

नेते म्हणतात तयारीला लागा… कार्यकर्ते म्हणतात आधी तारखा तर सांगा !

Posted by - August 7, 2022 0
आज निवडणुका होतील, उद्या निवडणुका होतील म्हणून इच्छुक उमेदवार केव्हापासून गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेत मात्र निवडणुकांना मुहूर्त काही लागेना. तिकडं…

पगार मागितल्यानं मालकाचं कामगारासोबत धक्कादायक कृत्य; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद VIDEO

Posted by - December 2, 2022 0
मुंबई : कळंबोलीमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. कामगाराने पैसे मागितल्याचा राग आल्यानं दुकानदाराने कामगारासोबत धक्कादायक कृत्य केलं. हे कृत्य…

पुणे महानगरपालिका हद्दीतील विनापरवाना बोर्ड,बॅनर आणि फ्लेक्सवर कारवाई ; 9 लाखांहून अधिक दंडवसूल

Posted by - September 22, 2022 0
पुणे : पुणे महानगरपालिकेने शहरातील विनापरवाना बोर्ड,बॅनर,फ्लेक्स,होर्डिंग आदींवर दंडात्मक कारवाई केली आहे. अशा होर्डिंगमुळे शहराचे विद्रूपीकरण होत असते. महानगरपालिकेच्या परवाना…

Maharashtra Politics : उद्धव ठाकरे यांच्या अडचणी वाढत ; शिवसेनेचे ‘ते’ 14 खासदार शिंदे गटाच्या मार्गावर

Posted by - July 18, 2022 0
मुंबई : शिवसेना हा आपलाच पक्ष आहे आणि त्यांचे चिन्हही आपलेच आहे,असा दावा करणाऱ्या शिंदे गटाकडून मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर शक्ती…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *