मोठी बातमी : मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर प्राणघातक हल्ला; हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरू

466 0

मुंबई : मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर चार अज्ञातांनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मॉर्निंग वॉकला बाहेर पडले असता देशपांडे यांच्यावर क्रिकेटच्या स्टम्पने हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यामध्ये देशपांडे जखमी झाले असून त्यांच्यावर हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आज मॉर्निंग वॉकला बाहेर पडले असताना चार अज्ञातांनी संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला केला. क्रिकेटच्या स्टंपने हा हल्ला केला आहे. हा हल्ला राजकीय वैमानस्यातून झाला असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. प्रसंगावधान राखून देशपांडे यांनी स्वतःचा बचाव केला. त्यामुळे त्यांनी त्यांच्या डोक्यावर होणारा घाव परतवून लावला परंतु त्यांच्या हाताला दुखापत झाली आहे.

कोण आहेत संदीप देशपांडे

संदीप देशपांडे हे राज ठाकरे यांचे निकटवर्तीय असून जेव्हा राज ठाकरे यांनी मनसेची स्थापना केली तेव्हापासून संदीप देशपांडे राज ठाकरेंसोबत आहेत. एक कट्टर मनसैनिक म्हणून त्यांची ओळख आहे. शिवसेनेच्या विद्यार्थी संघटना असलेल्या भारतीय विद्यार्थी सेनेतून त्यांच्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात झाली होती.

Share This News

Related Post

…तर नवं सरकार अवैध ठरेल ; सत्तासंघर्षावरील पुढील सुनावणी 28 फेब्रुवारीला; वाचा आज काय घडले ?

Posted by - February 23, 2023 0
नवी दिल्ली : राज्यातील सत्तासंघर्षाची सर्वोच्च न्यायालयात सुनवाई सुरू आहे. ठाकरे गटाकडून कायद्याचा अक्षरश: कीस काढला जात आहे. सुप्रीम कोर्टातली…

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी ! नवीन नळजोड देणे बंद होण्याची शक्यता

Posted by - May 6, 2022 0
पुणे- पुणे महापालिकेसमोर पाणीपुरवठ्याचे मोठे संकट उभे राहिले आहे. एकीकडे धरणात असलेला पाण्याचा कमी साठा तर दुसरीकडे २३ गावांना पाणीपुरवठा…
divorce

असाही एक घटस्फोट, पत्नीने सोडला पोटगीचा हक्क आणि….

Posted by - May 8, 2023 0
पुणे : आजकाल घटस्फोट (Divorce) झाला कि पतीला आपल्या पत्नीला पोटगी (Alimony) द्यावी लागते. मात्र कधी पत्नीने घटस्फोटादरम्यान आपल्या पत्नीला…
Amol Kolhe

Amol Kolhe : शिवाजीराव आढळराव पाटलांकडून पैसेवाटप होण्याची शक्यता; प्रतिस्पर्धी उमेदवार अमोल कोल्हे यांनी दिलं निवडणूक आयोगाला पत्र

Posted by - May 10, 2024 0
शिरूर : महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिरूरच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना एक पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी मतदानाच्या…
Ravindra Dhangekar

आमदार रवींद्र धंगेकरांनी वाचला पुण्यातील प्रश्नांचा पाढा

Posted by - July 6, 2024 0
पुणे : शहरातील जुन्या वाड्यांचा रखडलेला पुनर्विकास, पूरग्रस्त वसाहतींतील नागरिकांना लावलेला जाचक कर, पूरस्थितीमुळे होणारी पुणेकरांची तारांबळ इथंपासून अग्निशामक दलाचे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *