मोठी बातमी : पंढरपुरात उपवासाचे पदार्थ खाल्ल्याने 137 भाविकांना विषबाधा

1293 0

पंढरपूर : पंढरपूरमध्ये माघी यात्रेसाठी आलेल्या भाविकांनी भगर आणि आमटी खाल्ल्यानंतर त्यांना अचानक मळमळ आणि उलटीचा त्रास होऊ लागला. गुरुवारी पहाटे 137 भाविकांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, माघी यात्रा सोहळा साजरी करण्यासाठी 31 जानेवारी रोजी दरवर्षीप्रमाणे दिंडी पंढरपुरात पोहोचली. यानंतर पंढरपुरातील संत निळोबा सेवा मंडळ या मठामध्ये भाविकांनी मुक्काम केला होता.

उपवासाच्या दिवशी बुधवारी रात्री सर्वांनी भगर आणि आमटी खाल्ली होती. परंतु आज गुरुवारी पहाटेच्या सुमारास सर्वांना मळमळ उलट्या असा त्रास होऊ लागला त्यानंतर रुग्णवाहिका बोलवण्यात आली. बाधित सर्व 107 भाविकांना पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. योग्य उपचार वेळेत मिळाल्यामुळे सध्या या सर्व बाधितांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते आहे.

Share This News

Related Post

Pradip Shrama

Pradeep Sharma : माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा दोषी; ‘त्या’ प्रकरणी न्यायालयाने सुनावली जन्मठेप

Posted by - March 19, 2024 0
मुंबई : मुंबईचे माजी पोलीस अधिकारी आणि एनकाउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा (Pradeep Sharma) यांच्यावरील आरोप सिद्ध झाल्याने मुंबई हायकोर्टाने त्यांना…

पुणे कॅम्पमध्ये अनाथ आश्रमात आगीची घटना; 100 मुलांची सुखरुप सुटका VIDEO

Posted by - December 27, 2022 0
पुणे : काल मध्यराञी १२•४१ वाजता (दिनांक २७•१२•२०२२) २४१०, ईस्ट स्ट्रीट, कॅम्प, तय्यबीया मुलांचे अनाथ आश्रम, पुणे येथे आग लागल्याची…

खगोल प्रेमींसाठी मोठी पर्वणी; भारतासह संपूर्ण जगामध्ये खंडग्रास सूर्यग्रहणास सुरुवात 

Posted by - October 25, 2022 0
भारतासह संपूर्ण जगामध्ये खंडग्रास सूर्यग्रहणाला सुरुवात झाली आहे भारतात चार वाजून 17 मिनिटांनी सूर्यग्रहण दिसायला सुरुवात झाली 2022 या वर्षातील…
MNS Worker

Sinnar Toll Plaza : सिन्नर टोलनाका तोडफोडी प्रकरणी 8 जणांना अटक

Posted by - July 24, 2023 0
नाशिक : मनसे नेते अमित ठाकरे यांचा ताफा थांबवल्याने संतप्त मनसे कार्यकर्त्यांनी समृद्धी महामार्गावर असलेल्या सिन्नर येथील टोलनाक्याची (Sinnar Toll…

नागपूरच्या वज्रमूठ सभेत अजित पवार भाषण करणार नाहीत; समोर आलं ‘हे’ मोठं कारण

Posted by - April 16, 2023 0
नागपूर: महाविकास आघाडीची आज दुसरी वज्रमूठ सभा नागपूर येथे होणार आहे. या वज्रमूठ सभेची मविआकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *