BIG NEWS : देशात NIA आणि ED ची मोठी कारवाई ; PFI च्या 100 हून अधिक लोकांना अटक

369 0

राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि अंमलबजावणी संचालनालय केरळ, तमिळनाडू, कर्नाटक यासह दहा राज्यांमध्ये पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या अनेक ठिकाणांवर छापे टाकण्यात आले आहेत. एनआयए आणि ईडीने या राज्यांमधील पीएफआयच्या राज्य आणि जिल्हास्तरावरील नेत्यांच्या कार्यालयांसह घरोघरी झडती घेऊन आतापर्यंत १०० जणांना अटक केली आहे.

एनआयएने केलेली ही आत्तापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असून पीएफआयच्या अनेक ठिकाणांवर छापे टाकण्यात आले आहेत. दहशतवादाला निधी पुरवणे , प्रशिक्षण शिबिरे आयोजित करणे आणि लोकांना बंदी घातलेल्या संघटनांमध्ये समाविष्ट होण्यासाठी कट्टर बनवणे अशा कारवायांमध्ये जे व्यक्ती सामील आहेत त्यांच्या घरांवर आणि कार्यालयांवर देखील तपास यंत्रणांकडून शोध घेण्यात येतो आहे.

तसेच टेरर फंडिंग संदर्भात एनआयए कडून महाराष्ट्रात केलेल्या छापेमारीमध्ये पुण्यातसह नवी मुंबई ,भिवंडीतील २० जणांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे पीएफआयचे धाबे दणाणले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने एनआयए कडून टेरर फंडिंग बाबत कसून तपास केला जात आहे. या तपासाला वेग आला असून एनआयए कडून देशभरात मोठी कारवाई केली जाते आहे. या छापेमारीमध्ये 200 हून अधिक अधिकारी तपास करत असल्याचे समजते.

Share This News

Related Post

खासदार नवनीत राणा यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा

Posted by - April 13, 2022 0
अमरावती- खासदार नवनीत रवी राणा यांना केंद्रीय गृहमंत्रालयाद्वारे वाय प्लस सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. या निर्णयामुळे खासदार नवनीत रवी…

राज्यसभा निवडणूक; संजय राऊत आणि संजय पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल

Posted by - May 26, 2022 0
मुंबई- शिवसेना खासदार संजय राऊत आणि पक्षाचे कोल्हापूर विभाग प्रमुख संजय पवार यांनी राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी…

पुणे रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी; एकाचा मृत्यू

Posted by - October 22, 2022 0
पुणे:दीपावलीनिमित्त गावी जाण्यासाठी पुणे रेल्वे स्थानकावर आज मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. पुण्यातून दानापूरला जाणाऱ्या रेल्वे मध्ये चढताना प्रवाशांच्या चेंगरा…
no-water

Pune PMC Water Supply | पुण्यात 18 मे पासून पाणी कपात, ‘या’ दिवशी बंद राहणार शहराचा पाणी पुरवठा

Posted by - May 9, 2023 0
पुणे : पुणेकरांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. दि. 18 मे पासून दर गुरूवारी पुणे शहराचा पाणी पुरवठा (Pune…

#PUNE FIRE : मंगळवार पेठमध्ये फर्निचरच्या दुकानात आगीची घटना

Posted by - February 25, 2023 0
पुणे : मंगळवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौकानजीक फर्निचरच्या दुकानात आगीची घटना घडली आहे. अग्निशमन दलाकडून 5 वाहने दाखल झाली त्यानंतर…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *