भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी येथे राज्यपाल, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी केले अभिवादन

331 0

मुंबई : राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पचक्र अर्पण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.

दादर येथील चैत्यभूमी येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आज शासकीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड, विरोधी पक्ष नेते अजित पवार, खासदार राहुल शेवाळे, आमदार सर्वश्री संजय शिरसाट, प्रवीण दरेकर, सदा सरवणकर, कालिदास कोळंबकर, जयंत पाटील तसेच, प्रकाश आंबेडकर, आनंदराज आंबेडकर, मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. अशोक स्तंभाजवळील भीम ज्योतीचे दर्शन घेतले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिका जनसंपर्क विभागामार्फत आयोजित छायाचित्र प्रदर्शनास मान्यवरांनी भेट दिली.बृहन्मुंबई महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. मुंबई महापालिकेतर्फे प्रकाशित ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित माहिती पुस्तिका मान्यवरांना भेट देण्यात आली.

यावेळी भंते बी. संगप्पा महाथेरो, सुमेध बोधी, धम्मप्रीय यांनी मान्यवरांच्या उपस्थिती वंदना पठण केली. चैत्यभूमी स्तूप येथे व्यवस्थापक भिकाजी कांबळे, प्रतीक कांबळे, रमेश जाधव, अध्यक्ष उत्तम मग्रे यांनी कार्यक्रमाचे व्यवस्थापन पाहिले.

Share This News

Related Post

मालेगावात काँग्रेसच्या 28 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश ; अजित पवारांची नगरसेवकांना सूचना

Posted by - January 27, 2022 0
मुंबई- मालेगावातील काँग्रेसच्या 28 नगरसेवकांनी आज राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश…
Supriya-Sule-Ajit-Pawar-Maharastra

“अजितदादा महाराष्ट्राच्या राजकारणातील अमिताभ बच्चन,” सुप्रिया सुळेंचा केसरकरांना टोमणा

Posted by - June 16, 2023 0
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते, विरोधीपक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांना शिवसेनेचे नेते, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak…

“शरद पवार साहेब हे आरक्षण विरोधी; त्यांची भुमिका निषेधार्ह…!” – संभाजी ब्रिगेड

Posted by - December 30, 2022 0
पुणे : मराठा समाजाला आरक्षण मिळू द्यायचं नाही, म्हणून शरद पवार साहेबांची ही राजकीय चाल आहे. कारण शरद पवार साहेब…
Saatbara

Online Heir : तलाठ्यांच्या ताण होणार कमी; आता ऑनलाईन करता येणार वारस नोंद

Posted by - August 17, 2023 0
मुंबई : जर तुम्ही शेतकरी असाल किंवा शेतकरी कुटुंबातून येत असाल तर बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. शेतकरी कुटुंबातील कर्त्या…
Builder

बांधकाम परवानगीप्राप्त भूखंडास N.A ची गरज नाही; बिल्डरांना दिलासा

Posted by - May 25, 2023 0
कोल्हापूर : कोणत्याही प्रकारच्या जमिनीवर बांधकामासाठी महापालिका, नगरपालिका किंवा ग्रामपंचायत क्षेत्रात निवासी क्षेत्रात परवानगी दिल्यानंतर त्यासाठी पुन्हा अकृषक परवानगीची (Permission)…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *