“दाऊदच्या माणसांच्या कबरींचे सौंदर्यीकरण चालू आहे.” याकूब मेमनच्या कबर सजावटी वरून भाजपचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल ; पहा फोटो

363 0

मुंबई : 12 मार्च 1993 रोजी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे नेतृत्वाखाली मुंबईमध्ये स्फोट घडवून आणण्यात आले होते. यामध्ये 205 नागरिकांचा दुर्दैवी अंत झाला. तर 700 हून अधिक नागरिक जखमी झाले. या घटनेतील आरोपी याकूब मेमन याच्यावरील आरोप सिद्ध झाल्यानंतर त्याला फाशीची शिक्षा देण्यात आली . याच घटनेतील आरोपी याकूब मेमन याच्या कबरीचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

याकूब मेमनची कबर ही फुलांनी सजवण्यात आली आहे. दरम्यान एका गुन्हेगाराची कबर अशा पद्धतीने का सजवण्यात आली आहे ? असा सवाल भाजप नेते राम कदम यांनी उपस्थित करून उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळामध्येच याकूब मेमन याच्या कबरीचं मजार मध्ये रूपांतर करण्यात आल असल्याचा थेट आरोप देखील त्यांनी केला आहे.

या प्रकरणी भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. यावेळी ते म्हणाले की,”दाऊदच्या माणसांच्या कबरींचे सौंदर्यकरण करणे सुरू आहे. दाऊदचे प्रचारक म्हणून तुम्ही आता काम करा , त्यापेक्षा शिवसेनेने पुढचा कार्यक्रम हाच घोषित करावा पेंग्विन सेनेच्या युवा कार्यकर्त्यांनी कबर बचाव हा कार्यक्रम जाहीर करावा अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे.

दरम्यान या प्रकरणी कब्रिस्तानचे अध्यक्ष शोएब खातीब यांनी मात्र एक खुलासा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार शब्बे बारातच्या रात्रीचा हा फोटो असून हा जुना फोटो आहे. आणि खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत. कबरीवर कोणतीही सजावट नाही असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Share This News

Related Post

BIG NEWS : केदारनाथमध्ये खाजगी हेलिकॉप्टर कोसळले; 6 भाविकांचा मृत्यू

Posted by - October 18, 2022 0
केदारनाथ : केदारनाथमध्ये एक खाजगी हेलिकॉप्टर क्रॅश झाले असल्याची मोठी दुर्घटना घडली आहे. आज सकाळी ही दुर्घटना घडली असून, यामध्ये…

सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय : बलात्कार पीडितेवर केल्या जाणाऱ्या ‘Two Finger Test’ वर बंदी

Posted by - October 31, 2022 0
नवी दिल्ली : बलात्कार पीडित महिलांची तपासणी करत असताना कौमार्य चाचणी एक प्रक्रिया म्हणून मान्य केली जाणार नाही. असे महत्त्वपूर्ण…

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ द्विवार्षिक निवडणुकीची मतदान प्रक्रिया पूर्ण; २ फेब्रुवारीला मतमोजणी

Posted by - January 30, 2023 0
मुंबई : महाराष्ट्र राज्यातील दोन पदवीधर आणि तीन शिक्षक अशा पाच  मतदारसंघात आज शांततेते मतदान झाले असल्याची माहिती राज्याचे मुख्य…

#PATHAN : प्रदर्शनापूर्वीच अॅडव्हान्स बुकिंगसह 21 कोटींहून अधिकचा गल्ला; पठाणमुळे बंगाली चित्रपटांना मिळेना शो; निर्मात्यांनी केली ‘ही’ मागणी

Posted by - January 24, 2023 0
#PATHAN : शाहरुख खान चार वर्षांनंतर ‘पठाण’ या स्पाय थ्रिलर चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. एवढ्या दिवसानंतर किंग खानला चित्रपटगृहात…
CM EKNATH SHINDE

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तब्येतीत बिघाड ; प्रशासकीय बैठका रद्द…

Posted by - August 4, 2022 0
मुंबई : राज्यातील सातत्याने होणारे दौरे आणि बैठका यांच्या ताणतणावामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तब्येतीत बिघाड झाला असल्याचे समजते आहे.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *